कोयना वन्यजीव अभयारण्य

महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात मध्यभागी कोयना वन्यजीव अभयारण्य आहे. घनदाट अशा हिरव्यागार जंगलात ते वसलेले आहे. भारत सरकारने सन 1985 मध्ये या संरक्षित वनक्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले.
पश्चिम घाटामध्ये मुबलक पाण्याचा प्रवाह आणि समृद्ध वनस्पतींमध्ये असणारे हे अभयारण्य मन सुखावणारे आहे.

संपूर्ण अभयारण्य 423 चौ.मी. क्षेत्रफळावर पसरलेले आहे. अभयारण्यात ‘कांदाटी’, ‘कोयना’ आणि ‘सोळशी’ या नद्या आहेत. या परिसरात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आहेत. सरकारच्या वन विकास प्राधिकरणाद्वारे त्यांना संरक्षित केले आहे. सन 2012 मध्ये, युनेस्कोने ‘कोयना वन्यजीव अभयारण्य’ ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित केले.

कोयना वन्यजीव अभयारण्य उष्णकटिबंधीय पावसाळी हवामान आणि पावसाळ्यात अतिवृष्टी असलेल्या भागात आहे. या अभयारण्यात विविध सस्तन प्राण्यांच्या प्रजाती आहेत. याशिवाय, भारतीय बिबट्या, भारतीय बायसन, आळशी अस्वल, सांबर, हरीण, तपकिरी लंगूर असे अनेक प्राणी आढळतात. पक्ष्यांच्या अनेक प्रजाती येथे आढळतात. येथे मोठे भारतीय अजगर आणि किंग कोब्राही आढळतात. केवळ याच संरक्षित भागात ‘बुफो कोयान्सिस’ बेडूक आढळतो.

येथे मार्च ते नोव्हेंबरमध्ये वर्षभरातील सर्वाधिक पर्यटनक भेट देतात. हे अभयारण्य सकाळी 7.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेत खुले असते.
हे अभयारण्य पश्चिम घाटामुळे मोठ्या प्रमाणात संरक्षित आहे. हे संरक्षित क्षेत्र चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्याशी दक्षिणेला वन्यजीव कॉरिडॉरने जोडलेले आहे. कोयना नदीचे पाणलोट क्षेत्र आणि कोयना धरणाने तयार केलेला ‘शिवसागर’ जलाशय देखील येथे पाहता येतो. यामुळे येथे पर्यटकांची वर्दळ असते.






14,266 वेळा पाहिलं