
सध्या समाजमाध्यमांवर आणि प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली वेबमालिका म्हणजे ‘कुरुक्षेत्र’. या मालिकेचा पहिला भाग दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता ज्यात नऊ भाग होते तर ह्याच मालिकेचा आणखी दुसरा भाग दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा नवीन नऊ भागांसह प्रदर्शित करण्यात आला असून ह्या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कथा पाहताना प्रत्येक भाग नवीन विचार देतो आणि त्यामुळे पुढचा भाग पाहण्याची उत्सुकता अधिक वाढते.
‘कुरुक्षेत्र’ ही फक्त युद्धाची गोष्ट नाही तर माणसाच्या आयुष्यात चालणाऱ्या संघर्षाची गोष्ट आहे. कुणी आपल्या सत्यासाठी झगडतं तर कुणी सत्तेसाठी तर कुणी आपल्याच भावनांशी झुंज देतो. प्रत्येक पात्राचं आयुष्य वेगळं दिसतं आणि तरीही त्यात आपल्यासारखं काहीतरी ओळखीचं जाणवतं.या मालिकेचं कथानक खूप नीट विणलेलं आहे. कलाकारांचा अभिनय, संवाद आणि दृश्यं यामुळे कथा अधिक जिवंत वाटते. प्रेक्षक मालिकेत एवढे गुंततात की ती संपल्यावरही तिचे प्रसंग डोळ्यासमोर फिरत राहतात.
लोकांनी या मालिकेला समाजमाध्यमांवर जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी तिला “आजच्या काळाचं महाभारत” असं म्हटलं आहे. काहींनी ती “खऱ्या आयुष्याचं चित्र” असल्याचं सांगितलं आहे. मालिकेच्या शेवटाला पुढे एक विचार असाही येतो की “आपल्या आयुष्यातील खरं कुरुक्षेत्र कोणतं?” आणि हाच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतो.
एकंदरीत पाहता ‘कुरुक्षेत्र’ ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते, विचार करायला लावते आणि मनाला भिडते. कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन आणि कथा या तिन्ही गोष्टी उत्तम जमल्या आहेत. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही या मालिकेला ५ पैकी ४.५ गुण मिळाले असून गुगलवर ८२ टक्के लोकांना ही वेबमालिका पसंत पडली असल्याची माहिती समोर आली आहे.