लाडघर समुद्रकिनारा

रत्नागिरीतील दापोलीमध्ये लाडघर हा एक रोमांचक असा समुद्रकिनारा आहे. हा किनारा दापोलीपासून आठ किमी अंतरावर आहे. येथे जलक्रीडा, शांतता अनुभवत मजा लुटता येते. ‘लाडघर’ समुद्रकिनाऱ्याचा उत्तरेकडील भाग खडकाळ आहे, येथील बहुतेक भागात बारीक वाळू आणि दक्षिणेकडील भागात खडबडीत वाळू आहे. लाडघरला भरपूर हॉटेल्स आहेत.

त्रितारांकित हॉटेल्स रिसॉर्ट्सपासून घरच्या निवासापर्यंत विस्तृत श्रेणी आहे. लाडघर किनारा सूर्यास्ताच्या वेळी उमटणाऱ्या आकाशातील रंगांसाठी प्रसिद्ध आहे. आकाशातील केशरी-लाल रंगाचे मिश्रण समुद्राच्या पाण्याला देखील तेजस्वी रंग देते, त्यामुळे हा समुद्रकिनारा ‘तामस तीर्थ’ म्हणूनही ओळखला जातो. या किनाऱ्यावर जलक्रीडा आणि साहसी सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय येथे तांदळाची भाकरी, सोलकढी असे विविध प्रकारचे स्थानिक लोकप्रिय पदार्थ मिळतात. ज्यामुळे ते खाद्यप्रेमींसाठी एक परिपूर्ण ठिकाण बनते.







20,589