लायन्स क्लबची कन्यादान योजना

अलिकडे विवाह समारंभांवर अमाप उधळपट्टी केली जात आहे. तर दुसरीकडे मोठ्या संख्येतील लोकांना साध्या पद्धतीने विवाह करणेही मुश्किलीचे असल्याचे चित्र या समाजात दिसते.

‘लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट’ या संस्थेतर्फे समाजातील अशा गरजवंतांसाठी कन्यादान योजना राबविली जात आहे. येत्या २ मे रोजी या माध्यमातून आदिवासी जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. या जोडप्यांचा विवाह खर्च या संस्थेतर्फे केला जाणार आहे.लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ‘सोशल नेटवर्किंग फोरम’च्या सहकार्याने ही योजना चालते.

या जोडप्यास एक लोखंडी कपाट, प्रत्येक जोडप्यास संसारोपयोगी २५ भांडी, भांडी ठेवण्यासाठी स्टीलचे स्टॅंड, लोखंडी पलंग, गादी, उशी, बेडशीट, चादरी, वर-वधूचे विवाहांचे पोशाख, वर-वधूच्या आईसाठी साडी, वडिलांसाठी कपडे, भांडी ठेवण्यासाठी स्टीलचे स्टॅंड, इ. देण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रत्येक वधूस सोन्याचे मणी मंगळसूत्र, कानातील रिंग, जोडवी व चांदीचे अलंकार देण्यात येणार आहेत.