मास्टरमाईंड

‘मास्टरमाईंड’ हे मराठी नाटक सद्ध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. विजय केंकरे यांनी या
नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग येत्या १८ मे रोजी शिवाजी मंदिरात होणार
आहे.


जय विचारे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकात अदिती सारंगधर आणि आस्ताद काळे यांच्या
भूमिका आहेत. अशोक पत्कींचे संगीत व प्रदीप मुळ्येंचे नेपथ्य नाटकाला लाभले आहे. शीतल तळपदे यांची
प्रकाशयोजना आहे. हे एक रहस्यप्रधान नाटक असून या नाटकाला प्रतिसादही उत्तम आहे. नाटक पाहताना
क्षणाक्षणाला प्रेक्षकांची उत्कंठा वाढत जाते. यामुळेही रसिकांची नाटकास दाद मिळते.