मोबोर किनारा

गोव्यातील मोबोर सागरकिनारा हा पर्यटनासाठीचे एक आकर्षणाचे ठिकाण आहे. येथे बरेच उत्सव आणि उपक्रम नेहमीच चालू असतात. निसर्गप्रेमींसाठी हे गोव्यातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी हे एक आहे. फुललेल्या लिली, वाळूचे ढिगारे अशी सुंदर नैसर्गिक वैशिष्ट्ये येथे पहायला मिळतात.

ज्या लोकांना गोव्याचे दैनंदिन जीवन संपूर्णपणे अनुभवायचे आहे, किंवा ज्यांना सुट्टी अधिक संस्मरणीय करायची आहे त्यांनी येथे प्रवास करावा. येथे पर्यटक थंड पाण्यात पोहायला जाऊ शकतात. शांत वातावरणात समुद्रकिनारी एकटे वेळ घालवू शकतात. मोबोर किनारा म्हणजे तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेले एक जग आहे. येथे पाम आणि कॅसुअरिनाची झाडे आढळतात. गोव्यातील सर्वात शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक किनारा आहे.

समुद्राचे निळे, स्फटिकासारखे स्वच्छ पाणी हे एक विलोभनीय दृश्य आहे. मोबोर बीच हे शहरी अराजकतेपासून दूर असलेले एक आश्चर्य आहे. येथे जेट स्कीइंग, पॅरासेलिंग आणि विंडसर्फिंगसारखे साहसी खेळ खेळू शकतात. विविध पक्षी आणि परिसरातील विदेशी जैवविविधता पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथे पर्यटक पूर्ण शांतता आणि एकांतात आराम करू शकतात. येथील स्वच्छता आणि शांतता हे जोडप्यांसाठी आणि एकट्या प्रवाशासाठीसुद्धा सर्वात पसंतीचे ठिकाण बनवते. मोबोर किनारा हा दक्षिण गोव्यातील एक शांत समुद्रकिनारा आहे.