
नागाव’ हे अलिबागजवळ एक सुंदर समुद्रकिनारा असलेले एक छोटेसे गाव आहे. महाराष्ट्रात रायगड जिल्यातील अलिबागमधील इतर समुद्रकिनाऱ्यांपेक्षा ‘नागाव’ येथील समुद्रकिनारा प्रामुख्याने वालुकामय आहे. नागाव हा पांढऱ्या आणि काळ्या वाळूच्या मऊ मिश्रणासह सपाट आणि विस्तीर्ण किनारा आहे.
पाण्यात डुंबण्यासाठी हा सुरक्षित समुद्रकिनारा आहे. नागाव समुद्रकिनाऱ्याच्या सभोवतालचे वनक्षेत्र अतिशय प्रसन्न आहे. सुंदर पांढऱ्या वाळूसह साहसी खेळांच्या सुविधेमुळे हा किनारा लोकप्रिय होत आहे. नागावमध्ये सर्व साहसी खेळांचा आनंद घेता येतो.
पॅराग्लायडिंग, बनाना राईड, स्पीड बोट, हॉर्स कार्ट, हॉर्स रायडिंग आणि बरेच काही ! सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राइड्स इतर शहरांसारख्या महागड्या नाहीत. खबरदारी घेऊन या खेळांचा आनंद घेता येतो, आणि नागाव सहल अविस्मरणीय बनवता येते.