हिरामंडीतील नवे गाणे

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेले संजय लीला भन्साळी यांची पहिली
वेबमालिका ‘हीरामंडी’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रींनी सजलेल्या ‘हिरामंडी’ची पहिली
झलक पाहिल्यानंतर चाहते या वेबमालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेबमालिकेतील आणखी एक
नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे बोल ‘तिलस्मी बाहें’ असे असून ते सोनाक्षी सिन्हावर चित्रीत
करण्यात आले आहे.
या गाण्यात सोनाक्षीची किलर स्टाईल पाहण्यासारखी आहे. काही दिवसांपूर्वीच या वेबमालिकेतील ‘सकल बन’
चे पहिले गाणे प्रदर्शित झाले, याला रसिकांनी भरभरून दाद दिली. या दुसऱ्या गाण्यात सोनाक्षी सिन्हा तिच्या
सौंदर्याची झलक दाखवताना दिसत आहे. संजय लीला भन्साळी यांचे संगीत हे गाणे आणखी प्रेक्षणीय बनवत
आहे.


गायिका सर्मिष्ठा चटर्जी यांनी ‘तिलस्मी बाहे’ ला आवाज दिला आहे, गीतकार ए.एम. तुराज यांनी हे लिहिले आहे.
एकंदरीत ‘हिरामंडी’चे हे गाणे खूपच अप्रतिम आहे. भन्साळी म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालेल्या या
गाण्याला चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे.
या वेब मालिकेमध्ये पाकिस्तानच्या ‘रेड लाईट’ भागातील वेश्याव्यवसायांची कथा दाखविण्यात येणार आहे.
प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी ही मालिका १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित
होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.