रंगकाम व्यवसाय

वाढती लोकसंख्या व नोकऱ्यांची कमतरता यामुळे अलीकडे अनेक तरुण-तरुणी स्वत:चा व्यवसाय करण्यास पहिली पसंती देतात. आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल रंगकाम करणे हासुद्धा एक चांगला व्यवसाय आहे. घर, कार्यालयाच्या नुतनीकरणात भिंतींचे रंगकाम हा एक मुख्य टप्पा आहे. या व्यवसायासाठी रंग, ब्रश, शिडी, हे साहित्य नेण्यासाठी वाहन याची गरज असते. रंगकाम करण्यासाठी आधी या कामाचे ज्ञान मिळविणे फार गरजेचे आहे. रंगांचे ज्ञान असायला हवे. अलीकडे भिंतींवर आकर्षक नक्षीकाम करुन रंग अधिक उठावदार केला जातो. त्यामुळे या व्यवसायातील नवनवे तंत्रज्ञान वेळीच आत्मसात करायला हवे. रंगांचे प्रकार अर्थात रंगांचे ज्ञान आपण शिकायला हवे. रंगकाम सुरू करण्यात मोठा अडथळा येत नाही. रंगकाम करणाऱ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी फार काळ घालवावा लागत नाही. याचा अर्थ आपल्याला जेव्हा जेव्हा कारागिरांची आवश्यकता लागेल तेव्हा असे रंगकाम करणारे सहज मिळू शकतात.

घरांच्या रंगकामाची बारीकसारीक कौशल्ये काम करता-करताही आपण शिकवू शकता. रंगकाम व्यवसाय सुरू करण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्याची लवचिकता हे आहे. म्हणजे, आपण आपली एखाददुसरी लहानशी नोकरी करुनही हे काम करु शकता. आपण हे काम हंगामानुसार करु शकता. पावसाळ्यात रंगकाम नसते. उन्हाळ्यात व हिवाळ्यात ही कामे बहुतांशी असतात. रंगकाम व्यवसाय करण्यासाठी इतर क्षेत्रांपेक्षा कमी खर्चिक उपकरणे देखील लागतात. पॉवरटूल्स, वेल्डिंग उपकरणे, प्लंबिंग पुरवठा किंवा इतर ओव्हरहेड-जड साहित्याऐवजी गरजेपुरते सामान वापरून आपण व्यवसायाला सुरुवात करू शकता. इतर उपकरणे, जसे की मचान, पेंट स्प्रेअर ही उपकरणे व्यवसायात जम बसू लागल्यावर घेऊ शकता.

सुतारकाम आणि प्लंबिंग यांसारख्या इतर व्यवसायांप्रमाणे घरे कशी रंगवायची हे शिकण्यासाठी जास्त वेळ घालवावा लागत नाही. अधिक कुशल कामगार लागणार नाहीत. त्यामुळे कामगारांवर तेवढा खर्च करावा लागणार नाही. प्रत्येक बाजारासाठी हे खरे असू शकत नाही. तरीही अनेकदृष्ट्या लागू पडते. रंगकाम या व्यवसायाला फार चांगले दिवस आहेत. आधुनिकतेच्या या काळात नवनवीन सिमेंट-काँक्रीटच्या इमारती उभ्या राहत आहेत. या इमारतींना रंगकाम करण्यासाठी चांगल्या कारागिराच्या शोधात माणसे असतात. त्यामुळे हा व्यवसाय फायद्यातच आहे. उंच-उंच इमारती रंगविणे तेवढेच जोखमीचे काम आहे. अलीकडे रंगकामासाठी यंत्रसामग्री बाजारात उपलब्ध आहे. जसजसा व्यवसायात जम बसू लागेल तसा अशा यंत्रसामग्रीचा वापर करुन आपण आपला व्यवसाय अधिक उत्तम बनवू शकता.