विमानात धूम्रपान बंदी पण ॲशट्रे ठेवणे सुरूच

आजच्या युगात प्रत्येक विमानात धूम्रपान करण्यावर सक्त मनाई आहे. तशा सूचना प्रत्येक जागी स्पष्ट लिहिलेल्या असतात. तरीही अनेकांना आश्चर्य वाटते की, जेव्हा धूम्रपानास बंदी आहे, तेव्हा विमानातील शौचालयात अजूनही ॲशट्रे का ठेवले जातात? यामागे एक महत्त्वाचे सुरक्षा कारण आहे.

बहुतेक वेळा नियमांचे उल्लंघन करणारे काही प्रवासी लपून छपून शौचालयात सिगारेट ओढण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी जर ॲशट्रे  उपलब्ध नसेल, तर ते सिगारेट कचरापेटीत टाकण्याचा धोका असतो. ही सिगारेट पूर्णपणे विझलेली नसेल, तर विमानात आग लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे, ॲशट्रे असणे ही एक अत्यावश्यक सुरक्षाव्यवस्था मानली जाते.

अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी विमान कंपन्या आणि नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने शौचालयात आस्थ्रे ठेवणे बंधनकारक केले आहे. सिगारेट ओढण्यास बंदी असली, तरी ती जर कोणी ओढलीच, तर ती सुरक्षितपणे विझवण्यासाठी ठोस आणि नियंत्रित जागा असणे आवश्यक आहे. त्यामुळे आस्थ्रे ही सुरक्षा दृष्टीने महत्त्वाची बाब बनते.

यामुळेच आजही सर्व विमानांमध्ये, विशेषतः आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये, शौचालयाच्या दाराजवळ किंवा आत ॲशट्रे  जाणीवपूर्वक ठेवण्यात येतात. हे केवळ सुविधा म्हणून नव्हे, तर आग टाळण्यासाठीचा एक सुरक्षात्मक उपाय आहे. शिस्तभंग करणाऱ्या प्रवाशांविरोधात कठोर कारवाई केली जाते, मात्र सुरक्षा नियम म्हणून ॲशट्रे ठेवणे अनिवार्य राहते.