पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज
मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या काही तासांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरात ३०० मिलीमीटरहून अधिक विक्रमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृष्टीमुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली असून जनजीवन अंशतः प्रभावित झाले…