देवगडमधील तांबळडेग किनारा

महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडमध्ये तांबळडेग हा अप्रतिम सागरकिनारा आहे. कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांमध्ये गणला जावा असा हा किनारा आहे. स्वच्छ पांढरी वाळू, निळेशार पाणी असणारा ही किनारा एकांत प्रदान करणारा आहे. कसलीही गर्दी नाही.. सागराच्या साक्षीने स्वगत साधण्यासाठी मस्त असे हे ठिकाण आहे. सागरवेडा पर्यटक येथे हरखूनच जाईल, असा हा किनारा !

येथील वाळूचा किनारा तीन-साडेतीन किलोमीटर लांब आहे. किनाऱ्याच्या दक्षिण टोकाला ‘नारिंग्रे’ नदी सागराला येऊन मिळते. हे संगमाचे दृष्यसुद्धा मनमोहक असते. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असलेला, कोकणातील निसर्गरम्यता सभोवताली घेऊन लाटांनी फेसाळणारा गावाकडील समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतोच करतो.
शहराच्या गजबजाटापासून दूर असणाऱ्या किनाऱ्यांच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.






453 वेळा पाहिलं