
तारकर्ली समुद्रकिनारा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सर्वोत्तम कोकण किनारा आहे. येथील समुद्राचे पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आहे. समुद्रकिनारासुद्धा मस्त मोकळा आणि स्वच्छ आहे.
येथे ‘स्नॉर्कलिंग’ आणि ‘स्कूबा डायव्हिंग’चा आनंद लुटण्यासाठी आवर्जून पर्यटक येतात. पांढरी वाळू आणि स्वच्छ निळे पाणी, डॉल्फिन, कर्ली नदीचे रमणीय दृश्य डोळ्यांनी टिपता येते. कोकणी खाद्यपदार्थ आणि हापूस आंब्याची चव चाखता येते.
पर्यटकांमध्ये या ठिकाणाचे आकर्षण आटा वाढले आहे. कोकण किनार्याेवरील सर्वात नयनरम्य असा हा समुद्रकिनारा आहे. येथील पाणी इतके स्वच्छ आहे की आपण 15 फूट खोलीपर्यंतचा समुद्रतळ पाहू शकता.
गोव्याच्या किनाऱ्यावरील लोकप्रिय बोट राइड आणि पॅरासेलिंग अशा जलक्रीडांचा आनंद येथेही घेता येऊ शकतो. केरळच्या हाऊसबोट्स, स्नॉर्कलिंग आणि अंदमानचे स्कूबा डायव्हिंग हे सगळे या किनाऱ्यावर अनुभवता येते. म्हणून, येथे पर्यटकांचा ओघ वाढत आहे.