विजयदुर्ग समुद्रकिनारा

‘विजयदुर्ग समुद्रकिनारा’ हा महाराष्ट्रातील सर्वात अप्रतिम नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा किनारा म्हणजे या जिल्ह्याचे वैभव आहे. फेसाळणारा अरबी समुद्र, समोरील आकर्षक सौंदर्य आणि अन्य प्रमुख स्थानांव्यतिरिक्त ‘विजयदुर्ग’ हे महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेले ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सनाच्या १७ व्या शतकात बांधलेला ‘विजयदुर्ग किल्ला’ पाहण्यासाठी येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. यामुळे विजयदुर्ग समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. त्याचे सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळ पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात आवर्जून येतात.

विजयदुर्ग हा कोकणातील एक मनोहर समुद्रकिनारा आहे. येथे भरपूर हिरवाई आणि निसर्गसौंदर्य आहे. शांतता आणि सुखदायक वातावरणासोबतच विजयदुर्ग किनारा पर्यटकांना अनेक जलक्रीडांचा आनंद देतो. विजयदुर्ग किनाऱ्यावर वॉटर सर्फिंग, स्काइंग, स्कूबा डायव्हिंग, पोहणे आणि पॅरासेलिंग यांसारखे अनेक मनोरंजनात्मक खेळ उपलब्ध आहेत. पर्यटक त्यांचे ओझे भरलेले जीवन आणि व्यस्त वेळापत्रक येथे येऊन निसर्गाच्या कुशीत न्हाऊन निघतात. त्यांना विजयदुर्ग किनाऱ्यावरील स्वच्छ पाण्यात जलचर प्राणी पाहण्याचा आनंद मिळतो.

विजयदुर्ग किल्ला अनेक स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करीत असल्याने पर्यटक पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतात. विजयदुर्ग किनारा प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यास लावणारा एक किनारा आहे. येथे नैसर्गिक सौंदर्य विपुल प्रमाणात आहे. विजयदुर्ग किनारा आणि किल्ल्याला भेट दिल्यानंतर पर्यटकांना खूप ताजेतवाने आणि शांत वाटते. येथे पर्यटक आराम करतात, फिरतात, बसतात, सूर्यप्रकाशात स्नान करतात आणि सूर्योदय – सूर्यास्ताच्या दृश्यांचे साक्षीदार होतात.

विजयदुर्ग समुद्रकिनाऱ्याच्या अनुपम सौंदर्याने सर्वजण मंत्रमुग्ध होतात. नारळाची झाडे आणि हिरवीगार झाडे निसर्गाची श्रीमंती वाढवितात. विजयदुर्ग किल्ल्याचे सौंदर्य, तर डोळ्यात आयुष्यभरासाठी भरून राहते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे विजयदुर्गला समशीतोष्ण हवामान आहे. येथे हिवाळा फार थंड नसतो. उन्हाळासुद्धा आनंददायी असतो. विजयदुर्ग किनारा हे असे ठिकाण आहे जिथे व्यक्तीला ऊर्जा मिळते. शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा आणि समुद्रावरील वाऱ्यांमुळे पर्यटकांना चैतन्य मिळते. तथापि, विजयदुर्ग किल्ल्यावर भरपूर पाऊस पडतो. जे पर्यटक खेळांचा आनंद लुटण्यासाठी, मनोरंजनासाठी जाऊ इच्छितात त्यांनी हवामानाचा अंदाज आधीच घेतलेला बरा! येथील पर्यटन सफर प्रसन्नता देणारी आहे.






19,286 वेळा पाहिलं