नेपाळी आलू तारेको

साहित्य : 500 ग्रॅम बटाटे, पाव लहान चमचा मेथी दाणे ,४ सुक्या लाल मिरच्या, अर्धा लहान चमचा हळद पावडर, २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट,अर्धा मोठा चमचा धणेपूड, 2 लहान चमचे लाल मिरची पावडर, 1 चिमूट मिरपूड, ३ मोठे चमचे तेल, मीठ चवीनुसार.

पदार्थ बनवायला सुरुवात करण्यासाठी बटाटे सोलून धुवा आणि जाड काचऱ्यांमध्ये कापून घ्या. पाण्यात भिजवून बाजूला ठेवा. एका पॅनमध्ये 2 चमचे (शक्यतो) मोहरीचे तेल जास्त आचेवर गरम करा. आता आच कमी करून त्यात मेथी आणि सुक्या लाल मिरच्या टाकून तडतडू द्या. पाण्यातून निथळलेल्या बटाट्याच्या फोडी त्यात हळद, मीठ घालून चांगले ढवळून घ्या. हे बटाटे या फोडणीत वाफेवर शिजवा. आता शिजलेले बटाटे एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा. त्याच कढईत एक चमचा मोहरीचे तेल टाकून गरम करा. त्यात आले आणि लसूण पेस्ट घालून कच्चा वास निघेपर्यंत परतून घ्या. त्यावर धणेपूड, तिखट घालून चांगले परता. बटाटे पुन्हा पॅनमध्ये घाला आणि ते मसाले चांगले लागेपर्यंत नीट ढवळून घ्या. आता हे सारण 10 मिनिटे मंद आचेवर परता. ते कुरकुरीत होतात.