
साहित्य : नाचणी ४ वाट्या धुवून घ्यावी. स्वच्छ कापडावर पसरुन वाळवावी. त्याचे पीठ करुन घ्यावे. वेलचीपूड दीड चमचा, ३ वाट्या पिठीसाखर, कणीक १ वाटी, साजूक तूप १ ते दीड वाटी
कृती : प्रथम नाचणीचे पीठ आणि कणीक घ्यावी. तूप पातेल्यात घालून मंद आचेवर खरपूस (तांबूस) भाजून घ्यावे. थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलचीपूड घालून लाडू वळावेत. हे लाडू उन्हाळ्यातसुद्धा खाणे चांगले. नाचणीमध्ये कॅल्शियम असते. लाडूचे पीठ चांगले भाजले तर खमंग होतील. मधुमेह असलेल्यांनी हे लाडू खाऊ नयेत.