
हा एक केरळचा पदार्थ आहे.
साहित्य
अर्धा कप मूगडाळ, 1 कप खोवलेला नारळ, 3 लसणीच्या पाकळ्या, 3 चमचे खोबरेल तेल, 2 चमचे तूप, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, कढीपत्ता.
कृती
जाड बुडाच्या कढईत तूप गरम करा. आता मूगडाळ तांबुस रंगाची होईपर्यंत भाजा. एका भांड्यात 2 कप पाणी उकळवा. त्यात भाजलेली मूगडाळ घालून शिजवा, डाळ चांगली शिजली पाहिजे. डाळ घट्ट झाली तर पाणी घालून थोडी पातळ करा. शिजलेली डाळ चांगली घोटा. मीठ आणि हळद घालून चांगली मिसळा. खोवलेले खोबरे, जिरे आणि लसणीबरोबर वाटून घ्या. वाटलेले मिश्रण शिजलेल्या डाळीत पाणी घालून मिसळा. आचेवर चढवून काही मिनिटे उकळू द्या जोपर्यंत डाळ एकजीव होत नाही. हे झाले की, डाळ आचेवरून काढा आणि खोबरेल तेल आणि कढीपत्ता घाला. चांगले मिसळा.