त्वचा नितळ बनवा

लिंबाचा वापर केवळ पेयासाठीच नसून त्वचेसाठीही लिंबाचा फायदा उत्तम होतो. कारण यातील जीवनसत्व ‘सी’ हे त्वचेसाठी एक चांगले आणि उत्तम पोषक तत्व ठरते. घरीच बनवा फेसपॅक आणि मिळवा सुंदर नितळ त्वचा !
साहित्य :
१ लहान चमचा तांदळाचे पीठ
5 थेंब लिंबाचा रस
अर्धा चमचा गुलाबपाणी

बनविण्याची पद्धत : एका भांड्यामध्ये तांदळाचे पीठ घ्या. त्यात लिंबाचा रस आणि गुलाबपाणी मिसळून घ्या.
आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटांनी चेहरा धुवा. आठवड्यातून एक वेळा या ‘फेसपॅक’चा उपयोग करून बघा.

हा फेसपॅक चेहऱ्याला चमक देणारा आहे. चेहऱ्याला आणि त्वचेला अधिक चमकदार करण्यास तो मदत करतो. तांदळाच्या पिठात चेहऱ्याला अधिक तजेलदार करण्याचे तत्व असते. लिंबू हे त्वचा नितळ करण्याचे काम करते. या दोघांमधील गुणधर्मानी चेहरा अधिक चमकदार होतो. आपल्या ‘ब्युटीशियन’चा सल्ला अवश्य घ्या.







12,097