विविधरंगी जास्वंद
विविध रंगांमधील जास्वंद फुलाची वनस्पती ही सुंदर आकर्षक फुलांच्या वनस्पतींपैकी एक आहे. मुळात जास्वंदीची फुले म्हटल्यावर डोळ्यासमोर लाल फुले यायची. आता विविध रंगांमध्ये आकर्षक फुले मिळतात. ग्रामीण भागात घरासमोर जास्वंदीची झाडे दिसतात. फुलांनी बहरलेली ही वनस्पती पाहताक्षणी मन वेधून घेते. देवपूजेत या फुलांना मोठा मान असतो. या फुलांच्या रोपांची लागवड भांडी, मोकळी मैदाने, हरितगृह आणि पॉली हाऊसमध्ये केली जाऊ शकते. जेथे पुरेसे पाणी आणि सूर्यप्रकाश उपलब्ध असेल तेथे ही फुले वर्षभर फुलतात.
‘रोजा-सिनेन्सिस’ किंवा ‘चिनी गुलाब’ हे जास्वंदीचे वैज्ञानिक नाव आहे. देवपूजा, सौंदर्यप्रसाधने आणि हर्बल उपचार दोन्हीमध्ये या फुलाचा वापर केला जातो. योग्य वनस्पती व्यवस्थापन, काळजी आणि विपणन तंत्राने व्यावसायिक लागवडीतून पैसे कमावणे शक्य आहे. भारतातील बहुतेक लोक ही फुले सजावट, देवपूजेच्या उद्देशाने भांडी किंवा कंटेनरमध्ये वाढवतात.
या वनस्पतीला पुरेसा सूर्यप्रकाश आवश्यक असतो. वाढीच्या पहिल्या 4 महिन्यांत या वनस्पतींना पावसाची आवश्यकता असते. त्यामुळे पहिल्या पावसात ही रोपे लावली जातात. या रोपांना सेंद्रिय सामग्रीने समृद्ध असणारी जमीन मिळाल्यास भरपूर फुले मिळू शकतात. कुंडीत किंवा कंटेनरमध्ये लागवड करताना बागेतील ‘कंपोस्ट’ने युक्त असणारी माती वापरावी. ही या वनस्पतींसाठी सर्वोत्तम आहे. मातीचा निचरा प्रभावीपणे होत असलेल्या जमिनीत याची लागवड करावी.
या वनस्पतीला उष्ण आणि कोरड्या हंगामात दररोज पाणी द्यावे लागते. जेव्हा वरची पाने गळायला लागतात आणि पिवळी पडतात, तेव्हा समजावे की झाडाला पुरेसे पाणी मिळत नाही. पावसाळ्यात पाणी साचणार नाही याची खात्री करावी, कारण यामुळे झाडाची मुळे कुजतात. निरोगी फुलांसाठी जास्वंद वनस्पतींना भरपूर पोषकतत्वांची आवश्यकता असते. यासाठी उन्हाळ्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असलेले खत वापरावे.
ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात वाढलेल्या फांद्यांची छाटणी करावी. नवीन कोंब आणि कळ्यांच्या वाढीस चालना देण्यासाठी ही छाटणी करावी. सर्व कमकुवत आणि कडेकडेने वाढणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. 3 ते 4 मोठ्या सरळ वाढणाऱ्या फांद्या जतन करण्याचा प्रयत्न करावा. वनस्पतीला कोणताही रोग लागत असल्यास किंवा किटकांचा उपद्रव वाढला असल्यास तुमच्या स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधून योग्य उपचार करून घेणे गरजेचे आहे.
‘पूवन’ सारख्या उंच जाती 15-25 टन एवढे उत्पादन प्रति हेक्टर देतात. भारतात ‘पूवन’ ही जात तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील सर्वात महत्त्वाचा व्यावसायिक वाण आहे. याला महाराष्ट्रात ‘लाल वेलची’ असेही म्हणतात. ‘ड्वार्फ कॅव्हेंडिश’ किंवा ‘बसराई’ ही एक बटू जाती आहे. ही फळे मोठी आणि दर्जेदार असलेली उच्च उत्पन्न देणारी जात आहे. ‘रोबस्टा’ किंवा ‘हरिसाल’ या जातीत केळीचा पिकल्यावर फळांचा रंग हिरवा राहतो. निर्यातीच्या उद्देशाने ही सर्वोत्तम विविधता आहे. ‘मुठेली’ ही एक चांगली जात आहे. राजेळी, सोनकेळी, सफेद वेलची या काही केळीच्या प्रसिद्ध जाती आहेत.