स्टारशिप आवृत्ती तीनचे यशस्वी उड्डाण
अमेरिकेतील ‘स्पेसएक्स’ या खासगी अवकाश संशोधन कंपनीने ‘स्टारशिप’ या महाकाय प्रक्षेपकाच्या ‘आवृत्ती तीन’ची बारावी चाचणी मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली. इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेचे प्रक्षेपण अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ‘स्टारबेस’ केंद्रातून करण्यात आले. सुरुवातीला तांत्रिक अडचणीमुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते; मात्र नंतर सायंकाळी यशस्वी…