अंटार्क्टिकाच्या आकाशात अद्भुत वलये
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने अंटार्क्टिकाच्या पश्चिमेकडील अतिशय दुर्गम भागात असलेल्या पीटर प्रथम बेटाजवळ फिरत्या ढगांचे एक विलक्षण दृश्य टिपले आहे. बेलिंग्सहाउझेन समुद्रामध्ये असलेल्या या ज्वालामुखीय बेटाभोवती ढगांची विशाल वलये तयार झाली आहेत. या नैसर्गिक अविष्काराने जगभरातील वैज्ञानिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे विलोभनीय छायाचित्र…