आयुर्वेदिक औषधांचे दुकान

जगाला पुन्हा एकदा आयुर्वेदाचं महत्त्व समजू लागलं आहे. झटपट औषधांपेक्षा मूळातून आजार बऱ्या करणाऱ्या आयुर्वेदिक उपचारपद्धतीकडे लोकांची जास्त ओढ आहे. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
आयुर्वेदिक दवाखाना, रुग्णालय यांच्या आसपासच्या परिसरात किंवा एखाद्या वैद्याच्या दवाखान्यामध्येही थोडी जागा घेऊन आपण औषधालय सुरू करू शकतात. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जागा उपलब्ध असल्यास वैद्यांना आपल्या दुकानातील थोडी जागा वापरण्यास देऊ शकतात. जेणेकरून रुग्णांना वैद्य आणि औषधं ही एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.
वेगवेगळ्या नामांकित आयुर्वेदिक औषधं बनवणाऱ्या रसशाळांशी किंवा अर्कशाळांशी संपर्क साधून त्यांचा माल तुम्ही तुमच्या दुकानात थेट विक्रीस उपलब्ध करून देऊ शकतात. त्याचप्रमाणे अनेक वाळवलेल्या वनस्पतीही तुम्ही तुमच्या औषधभांडारात ठेवू शकतात. जेणेकरून घरच्या घरी उपचार करण्यासाठी, काढा बनवून पिण्यासाठी सहज कोणीही त्याचा वापर करू शकेल.
आयुर्वेदिक औषधे किंवा वाळवलेल्या औषधी वनस्पती या काचेच्या बरणीतून भरून ठेवतात. त्यावर बदलत्या हवामानाचा परिणाम होणार नाही ना, याचीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक औषधांची समाप्ती तिथी ही खूप उशिराने असते. त्यामुळे आपल्याजवळची औषधे उत्पादन समाप्ती दिनांकाच्या जवळ आलेली नाही ना, त्याचप्रमाणे वाळवलेल्या औषधांवर वातावरणाच्या परिणाम झाला नाही ना हे वेळोवेळी तपासणे आवश्यक असते. औषधांची समाप्ती दिनांक आलेली असल्यास किंवा वाळलेल्या औषधांवर परिणाम झाला असल्यास तत्काळ नवीन मालाचा भरणा करणे महत्त्वाचे आहे.
शहरी भागात आयुर्वेदिक औषधांचे दुकान सुरू करायचे असल्यास किमान ८ लाखांपर्यंतची गुंतवणूक करावी लागेल. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक औषधालय सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने, जी एस टी क्रमांक यांची नोंद असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे रुग्णाला कोणतेही औषध देण्यापूर्वी वैद्याची चिठ्ठी किंवा रुग्णाच्या आजाराचे स्वरुप जाणून घेऊनच त्याला औषधाची विक्री करावी.