भंडारदरा धरण

भंडारदरा हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे. येथील ‘प्रवरा’ नदीवर सन 1910 मध्ये बांधलेले ‘विल्सन धरण’ हे सर्वात मोठे मातीचे धरण आहे. या धरणाला ‘भंडारदरा धरण’ म्हणूनही ओळखले जाते. हे धरण त्या काळातील अभियांत्रिकीच्या उत्कृष्टतेबद्दल माहिती देते. या धरणाच्या पायथ्याशी असलेली घनदाट हिरवळ मनमोहक आहे. येथील मोठमोठी झाडे आणि छोटे ओढे यांनी नटलेली सुंदर बाग लक्ष वेधून घेते.

पावसाळ्यात, जेव्हा पाण्याची पातळी वाढते, तेव्हा मैदानात पाणी सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडतात, त्यावेळी बागेतून पाण्याच्या शिंपडण्याचा आनंद घेता येतो. येथे ‘छत्री धबधबा’ हे आणखी एक लोकप्रिय ठिकाण आहे. हा धबधबा पावसाळ्यात दिसतो.

हे स्थान निसर्गसौंदर्याने नटलेले असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा मूळच्या सौंदर्यात अजून भर टाकतात. भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. भंडारदरा धरणाच्या जलाशयास ‘आर्थर लेक’ असे म्हटले जाते. हे प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालेला आहे. प्रवरा नदीचे पाणी अमृतासमान असून या नदीला ‘अमृतवाहिनी’ असे म्हटले जाते.






225 वेळा पाहिलं