
साहित्य : कारले (पातळ काप)-2 कप, खोबऱ्याचे पातळ काप – अर्धा कप, हिरव्या मिरच्या (लांब चिरलेल्या) -4, लाल तिखट – 1 चमचा, हळद-अर्धा चमचा , तळण्यासाठी खोबरेल किंवा तिळाचे तेल,मीठ.
कृती:
कारल्याचे पातळ काप पाण्यात धुवून घ्यावेत. त्याचे पाणी काढून टाकावे. लाल तिखट, हिरव्या मिरच्या, नारळाचे तुकडे, हळद आणि मीठ घालावे. हाताने चांगले मिसळून घ्यावे. काही मिनिटांसाठी तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर कारली मंद आचेवर गुलाबी रंगाची होईपर्यंत कुरकुरीत तळावीत. ही भाताबरोबर खायला छान लागतात.