ब्रेडचा उपमा

रिमझिम पावसाची बरसात सुरू असताना चटपटीत, पटकन होणारे गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा कुणाला नाही होणार ? त्यासाठीच तर आज बनवूया ‘ब्रेडचा उपमा’ !

साहित्य : ब्रेडचे तुकडे – ३ कप, मोहरी – २ लहान चमचे, कढीपत्ता – १ मोठा चमचा, आले चिरून – १ लहान चमचा, चिरलेला कांदा – अर्धा कप, चिरलेला लसूण – १ लहान चमचा, हळद – अर्धा लहान चमचा, टोमॅटो चिरून – १ कप, हिरवी मिरची चिरलेली – २ लहान चमचे, मिरची पावडर – १ लहान चमचा, हिरवी कोथिंबीर चिरलेली – २ चमचे, लिंबाचा रस – २ लहान चमचे, तेल – २ चमचे, मीठ – चवीनुसार.

कृती : ब्रेड उपमा बनविण्यासाठी सर्वप्रथम ब्रेडचे तुकडे करावेत. हवे असल्यास ब्रेडच्या चारही बाजू कडा कापून वेगळ्या करू शकता. आता कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडायला लागली की, त्यात कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, आले घालून परतून घ्यावे. कांदे १-२ मिनिटे परतून घेतल्यावर बारीक चिरलेला टोमॅटो, मिरची पावडर आणि हळद घालून मिसळून घ्यावे. यानंतर २ लहान चमचे पाणी घालावे. हे मिश्रण २-३ मिनिटे शिजू द्यावे. चवीनुसार मीठ घालावे. आता हे मिश्रण एकजीव करुन घ्यावे. आता त्यात ब्रेडचे तुकडे टाकून चांगले मिसळून मध्यम आचेवर १ मिनिट शिजवावे. यानंतर गॅस बंद करावा. वरुन कोथिंबीर घालावी. चविष्ट ‘ब्रेड उपमा’ तयार आहे. खाण्यासाठी देताना आवडत असल्यास वरुन लिंबाचा रस वापरु शकता.






15,540 वेळा पाहिलं