मका शेती
मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक आहे; मात्र पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास ते या पिकास मानवत नाही. या पिकाच्या योग्य वाढीसाठी २५ ते ३० अंश से. तापमान चांगले असते; परंतु जेथे सौम्य तापमान आहे, अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो….
तूर लागवड
तूर हे एक लोकप्रिय कडधान्य पीक असून प्रथिनांनी समृद्ध आहे. उष्णकटिबंधीय आणि अर्धउष्णकटिबंधीय प्रदेशात याची लागवड केली जाते. तूर लागवडीसाठी हलकी अल्कधर्मी, खोल आणि ओलसर माती लागते. तुरीचे बियाणे जून महिन्यात पेरणे आवश्यक असते. चांगल्या नांगरलेल्या जमिनीत या पिकाचे उत्पादन चांगले येते. कडधान्य पिकांचे क्षेत्रफळ…
ज्वारी लागवड
भारतातील ज्वारीच्या लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी 50% क्षेत्र महाराष्ट्रात आहे. देशातील एकूण ज्वारी उत्पादनापैकी 52% उत्पादन महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमध्ये होते. ज्वारी हे खरीप आणि रब्बी पीक आहे. हे कोरडवाहू शेतीप्रकारातील सर्वात महत्वाचे अन्न आणि चारा पीक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर…
कमळ शेती
‘कमळ’ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. अनेक औषधी आणि पौष्टिक गुणधर्मामुळे कमळाकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले जाते. भारतात गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची मनमोहक कमळाची फुले आढळतात. साधारणपणे कमळाच्या पाकळ्यांची संख्या 16 ते 36 पर्यंत असते. कमळात अनेक औषधी आणि पौष्टिक गुणधर्म आहेत. प्राचीन आयुर्वेदात मधुर, शीतल,…
सुगंधित सोनचाफा
सोनचाफा हे सर्वात लोकप्रिय फुलझाडांपैकी एक आहे. खोली सुगंधित करण्यासाठी, फुलांच्या हारात, तसेच धार्मिक समारंभांमध्ये, सुशोभिकरणासाठी या फुलांचा उपयोग केला जातो. जमिनीतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करण्यासाठी हे झाड उपयुक्त आहे. या झाडाची पाने पालापाचोळा देतात. या झाडांमुळे जमिनीचा सामू सुधारतो. मातीतील सेंद्रिय कार्बन आणि फॉस्फरसचे प्रमाण…
विविधरंगी जास्वंद
विविध रंगांमधील जास्वंद फुलाची वनस्पती ही सुंदर आकर्षक फुलांच्या वनस्पतींपैकी एक आहे. मुळात जास्वंदीची फुले म्हटल्यावर डोळ्यासमोर लाल फुले यायची. आता विविध रंगांमध्ये आकर्षक फुले मिळतात. ग्रामीण भागात घरासमोर जास्वंदीची झाडे दिसतात. फुलांनी बहरलेली ही वनस्पती पाहताक्षणी मन वेधून घेते. देवपूजेत या फुलांना मोठा मान…
सफरचंद लागवड
सफरचंद हे आरोग्यदायी आणि चविष्ट असल्याने इतर फळांच्या तुलनेत सर्वाधिक खपणारे फळ आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू येथे या फळाची लागवड केली जाते. उच्च वापर आणि औषधी मूल्यांमुळे हे सर्वात फायदेशीर फळ पीक देखील मानले जाते. हे एक समशीतोष्ण फळ म्हणून…
सीताफळ लागवड
सीताफळ हे गोड फळ सर्वांच्या आवडीचे आहे. महाराष्ट्रात बीड, औरंगाबाद, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यात ते घेतले जाते. बार्शीमध्ये ‘एनएमके-०१’ (गोल्डन) या उत्तम दर्जाच्या संकरित जातीची लागवड केली जाते. ‘लाल सीताफळ’, ‘बालानगरी’, ‘वॉशिंग्टन’ आणि ‘पुरंदर’ यांसारख्या इतर जातीसुद्धा प्रसिद्ध आहेत. बीडचे हे सर्वात प्रसिद्ध फळ आहे….
पपई लागवड
पपई हे एक उष्णकटिबंधीय फळ आहे. उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्यामुळे या फळास व्यावसायिक महत्त्व आहे. पपईची लागवड ‘दक्षिण मेक्सिको’ आणि ‘कोस्टारिका’ येथे झाली. इतर फळपिकांपेक्षा ते लवकर उत्पादन नेते. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत फळे देते. फळांचे उत्पादनही जास्त असते. ईशान्येकडील सर्व राज्यांच्या पायथ्याशी आणि…
कॉफी शेती
भारतातील कॉफी उत्पादनाचे दक्षिण भारतीय राज्यांच्या डोंगराळ प्रदेशात वर्चस्व आहे. यामध्ये कर्नाटकचा वाटा ७१% आहे. येथील एकट्या ‘कोडागु’ मध्ये भारतातील ३३% कॉफीचे उत्पादन होते. त्यानंतर २१% सह केरळ आणि तमिळनाडू ही दोन राज्ये आहेत. भारतीय कॉफी ही थेट सूर्यप्रकाशाऐवजी सावलीत उगवलेली जगातील सर्वोत्तम कॉफी असल्याचे…
गवती चहा
गवती चहा ही मुख्यतः युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका खंडातील उष्णकटिबंधीय तृणवर्णीय वनस्पती आहे. भारतात केरळ, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये गवती चहाचे पीक घेतले जाते. गवती चहा बारमाही प्रकारातील एक आरोग्यदायी गवत आहे. हलक्या ते भारी जमिनीत हे पीक घेतले जाते. पाणी साचून जमिनीचा निचरा होत नसेल अशा जमिनीत…
कोथिंबीर शेती
कोथिंबीरीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्यात केली जाते. कोथिंबीरीला देशभरात वर्षभर मागणी असते. कोथिंबीरीची लागवड कोणत्याही हवामानात करता येते. अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील हवामानात वर्षभर कोथिंबीरीची लागवड करता येते. उन्हाळयात तापमान 36 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास कोथिंबीरीची वाढ कमी होते. कोथिंबीरीच्या पिकासाठी मध्यम कसदार आणि…
टरबूज लागवड
‘टरबूज’ हे मूळ दक्षिण आफ्रिकेतील फळ आहे. टरबूजाच्या रसामध्ये प्रथिने, खनिजे आणि कार्बोहायड्रेट्ससह 92% पाणी असते. जपानमध्ये काचेच्या पेटीत टरबूज वाढवतात. टरबूजांची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये केली जाते. टरबूज खोल, सुपीक आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत चांगले वाढते….
खजूर शेती
खजुराची लागवड प्रामुख्याने अरब देश, इस्राइल आणि आफ्रिका या देशांमध्ये केली जाते. इराण हा खजूरांचा प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार आहे. गेल्या दशकांपासून भारत सरकार खजूर लागवडीसाठी खूप मेहनत घेत असून लागवडीखालील क्षेत्र वाढवत आहे. भारतात राजस्थान, गुजरात, तामिळनाडू आणि केरळ ही खजूर पिकवणारी प्रमुख राज्ये…
द्राक्ष शेती
‘द्राक्ष शेती’ हे जगातील अतिशय लोकप्रिय पीक आहे. बहुतेक देशांमध्ये ते व्यावसायिकरित्या घेतले जाते. ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. यात ‘ब’ जीवनसत्व आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. द्राक्ष ही कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांचा चांगला स्रोत आहे. द्राक्ष कच्ची खाण्यासाठी वापरली जातात. जेली, जाम, मनुका,…
वांग्याची लागवड
‘वांगी’ पिकाची लागवड वर्षभर खरीप आणि रब्बी हंगामात व अगदी उन्हाळ्यातही करता येते. कोरडवाहू शेतीत, तर कधी मिश्रपीक म्हणूनही वांग्याची लागवड करतात. पांढरी वांगी मधुमेही व्यक्तींसाठी गुणकारी असतात. वांग्यामध्ये खनिजे, ‘अ’,‘ब’, ‘क’ ही जीवनसत्त्वे; तसेच लोह, प्रथिने यांचे पुरेसे प्रमाण पुरेसे असते. महाराष्ट्रात अंदाजे 28,…
मेथीची लागवड
महाराष्ट्रात मेथी ही पालेभाज्यांमधील लोकप्रिय पालेभाजी आहे. मेथी पीक म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. दैनंदिन आहारात मेथीचा वापर आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे या पिकाला वर्षभर चांगली मागणी असते. मेथी पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते काळी आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते….
भेंडीची शेती
महाराष्ट्रात भेंडीची लागवड अनेक जिल्ह्यांत केली जाते. भेंडीला ग्राहकांची मागणीही मोठ्या प्रमाणात असल्याने याचे उत्पादन वर्षभर घेता येते. भेंडीमध्ये कॅल्शियम, आयोडिन आणि ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. भेंडीचे पीक खरीप आणि उन्हाळी हंगामात चांगले येते. भेंडीच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी शेतजमीन आवश्यक असते. किमान…
लिची लागवड
उष्णकटिबंध प्रदेशातील ‘लिची’ची लागवड भारतात अनेक ठिकाणी केली जाते. हे मूळ ‘चीन’मधून आलेले फळ आहे. चीनच्या खालोखाल लिची उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. जम्मू – काश्मीर, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामध्ये लिचीची लागवड प्रामुख्याने केली जाते. आता हळूहळू लिची उत्पादन घेण्यासाठी इतर राज्येही पुढे येत…
सुरण लागवड
‘सुरण’ ही उष्णकटिबंधीय भागातील कंदमूळ गटातील वनस्पती आहे. आशिया आणि आफ्रिका खंडात उत्पादन घेतले जाते. विशेषतः भारतातील केरळ, तामिळनाडू, गुजरात या राज्यांत आणि श्रीलंकेत सुरणाची शेती केली जाते. महाराष्ट्रात तुलनेने सुरणाची शेती मर्यादित स्वरुपात आढळते. हे पिकाची वाढ उष्ण प्रदेशात, उबदार आणि ओलसर हवेत चांगली…
केवडा लागवड
भारतात फुलशेतीला महत्त्व प्राप्त होत आहे. बरेच शेतकरी फुलांची शेती करताना आपण महाराष्ट्रातही पाहायला लागलो आहोत. बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने फुलशेतीमध्ये यश मिळताना दिसत आहे. केवड्याचा वापर सुगंधी द्रव्ये, मिठाई, सौंदर्य उत्पादने यांमध्ये केला जातो. ‘केवडा’ हा जगातील सर्वांत सुगंधी फुलांच्या यादीमध्ये स्थान मिळवलेलं…
फणस शेती
फणस हे नगदी पीक आहे. त्यामुळे याची शेती ही नेहमी फायद्याची शेती मानली जाते. कोकण आणि दक्षिण भारतात या जोरावर अनेक प्रक्रिया उद्योग उभे आहेत. पक्क्या फणसाएवढाच कच्च्या फणसापासून तयार केलेले पदार्थही चविष्ट आणि रुचकर असतात. त्यामुळे कच्च्या आणि पक्क्या दोन्ही स्वरुपातील फणसांना बाजारात विशेष…
फरसबी शेती
फरसबीची भाजी अनेकांना आवडते. फरसबी पुलावासह अनेक पदार्थांची लज्जत वाढवते. ही भाजी वेलवर्गीय आहे. ही रोपे नेहमीच्या रोपांप्रमाणेच वाढतात, म्हणून त्यांना कोणत्याही अन्य गोष्टींची आवश्यकता नसते. फरसबी अतिशय लवचिक असतात. ती सूर्यप्रकाशात आणि सावलीतही चांगली वाढतात. अर्धवट सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडा. फरसबी झुडूपवर्गीय नसल्याने…
कागदी लिंबू शेती
कागदी लिंबांना बाजारात सर्वाधिक मागणी आहे. कागदी लिंबे आकाराने लहान, 40 ते 45 ग्रॅम वजनाची असतात. या फळाची साल अगदी पातळ असते. त्याच्या रसाला मागणी जास्त आहे. झाडाला काटे जास्त असून झाडे वर वाढतात. काही लिंबे आकाराने मोठी असतात. वजन सुमारे 50 ते 70 ग्रॅम…
बटाटा साठवणुकीचे प्राचीन तंत्र
महाराष्ट्रातील विदर्भासारख्या भागात बटाटा शेती केली जाते. बटाटा हे असे पीक आहे, ज्याची साठवणूक केल्यावर कोंब येऊन ते खाण्यायोग्य राहत नाहीत. काश्मीरमध्ये बटाटा साठवणुकीचे एक प्राचीन तंत्र असून ते तेथील शेतकऱ्यांनी आजपावेतो जपून ठेवले आहे. थंडीच्या दिवसांत काश्मीरचे ‘गुरेझ’ खोरे हे मुसळधार बर्फवृष्टीमुळे सहा महिने…