पपई लागवड
पपई हे एक उष्णकटिबंधीय फळ आहे. उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्यामुळे या फळास व्यावसायिक महत्त्व आहे. पपईची लागवड ‘दक्षिण मेक्सिको’ आणि ‘कोस्टारिका’ येथे झाली. इतर फळपिकांपेक्षा ते लवकर उत्पादन नेते. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत फळे देते. फळांचे उत्पादनही जास्त असते. ईशान्येकडील सर्व राज्यांच्या पायथ्याशी आणि…
शाई निर्मिती
कमी भांडवलात निश्चितपणे फायदेशीर उद्योग शोधत असाल तर शाई उत्पादन उद्योग हा एक चांगला पर्याय आहे. या मालाला वर्षभर मागणी असते. दैनंदिन जीवनातील सर्व लिखित कामांसाठी शाईची आवश्यकता असते. शाळेतील मुलांना लिहिण्यापासून ते सरकारी आणि खासगी कार्यालयात शिक्के मारण्याच्या कामापर्यंत शाई लागते. शाईचे पेन असो…
पॉलिथिनपासून पोती निर्मिती
प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर चांगला वापर करणारा उद्योग म्हणजे उच्च घनतेच्या पॉलिथिनपासून बनवलेल्या पोत्याचा उद्योग होय. या उद्योगाला बाजारपेठेत सर्वत्र मागणी असूनही प्रामुख्याने सिमेंट उद्योगात अशा पोत्यांचा वापर बहुतांशी सिमेंट भरण्यासाठी केला जातो. तंबू तयार करण्यासाठी, बागांच्या छतांसाठी विणलेल्या प्लास्टिकच्या जाड कागदाचा वापर केला जातो. सिमेंट…
कॉफी शेती
भारतातील कॉफी उत्पादनाचे दक्षिण भारतीय राज्यांच्या डोंगराळ प्रदेशात वर्चस्व आहे. यामध्ये कर्नाटकचा वाटा ७१% आहे. येथील एकट्या ‘कोडागु’ मध्ये भारतातील ३३% कॉफीचे उत्पादन होते. त्यानंतर २१% सह केरळ आणि तमिळनाडू ही दोन राज्ये आहेत. भारतीय कॉफी ही थेट सूर्यप्रकाशाऐवजी सावलीत उगवलेली जगातील सर्वोत्तम कॉफी असल्याचे…
खोके निर्मिती उद्योग
कोणत्याही उत्पादनाचे वितरण आणि वाहतूक करताना व्यापारी आणि उत्पादकांना छोट्या-मोठ्या खोक्यांची सर्वात जास्त गरज असते. ‘कोरुगेटेड’ पेट्या वजनाने खूप हलक्या आणि लाकडी खोक्यांपेक्षा स्वस्त असतात. टिकाऊ आणि कमी किंमतीमुळे खोक्यांना व्यापारी आणि उत्पादक प्राधान्य देतात. खोके लाकडाच्या लगद्यापासून तयार केले जातात, परंतु यामध्ये 20 ते…
पाणीपुरी व्यवसाय
प्रत्येकाला पाणीपुरी खायला आवडते. त्यामुळे पाणीपुरी व्यवसाय प्रत्येक ठिकाणी चालतो. सध्या संपूर्ण देशात असे एकही ठिकाण नाही जिथे पाणीपुरी बनविण्याचा व्यवसाय होत नाही. विशेषतः उत्तर भारतातील लोक मोठ्या चवीने खातात. ‘गोलगप्पा’, ‘फुचका’, ‘फुलकी’ इत्यादी नावांनी पाणीपुरी संबोधली जाते. या मसालेदार पदार्थाचे नाव ऐकताच तोंडाला पाणी…
गवती चहा
गवती चहा ही मुख्यतः युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका खंडातील उष्णकटिबंधीय तृणवर्णीय वनस्पती आहे. भारतात केरळ, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये गवती चहाचे पीक घेतले जाते. गवती चहा बारमाही प्रकारातील एक आरोग्यदायी गवत आहे. हलक्या ते भारी जमिनीत हे पीक घेतले जाते. पाणी साचून जमिनीचा निचरा होत नसेल अशा जमिनीत…
प्लास्टिक उद्योग
माणसाच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. लोक सकाळी झोपेतून उठल्याबरोबर दात घासताना ब्रश घेतात. आपल्या दैनंदिन जीवनाची पहाट प्लास्टिकच्या वापराने सुरू होते. भारतात वर्षभरात 20 लाख टन प्लास्टिक तयार होते. कंगवा, बादल्या, नळ, चप्पल, टेबल, खुर्च्या, इलेक्ट्रिक फिटिंगचे…
प्लास्टिक बाटल्यांची निर्मिती
औद्योगिक आणि इतर क्षेत्रात प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे प्लास्टिकच्या वस्तूंना मोठी मागणी आहे. खुर्च्या, टेबल, फर्निचरपासून ते स्वयंपाकघरातील अनेक वस्तूंपर्यंत सर्व काही प्लास्टिकचे बनवले जात आहे. आकर्षक, वापरण्यास सुलभ, कमी वजन आणि कमी किमतीमुळे प्लास्टिकच्या वस्तू ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिक उत्पादनांपैकी एक महत्त्वाचा…
कोथिंबीर शेती
कोथिंबीरीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्यात केली जाते. कोथिंबीरीला देशभरात वर्षभर मागणी असते. कोथिंबीरीची लागवड कोणत्याही हवामानात करता येते. अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील हवामानात वर्षभर कोथिंबीरीची लागवड करता येते. उन्हाळयात तापमान 36 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास कोथिंबीरीची वाढ कमी होते. कोथिंबीरीच्या पिकासाठी मध्यम कसदार आणि…
प्लायवुड उद्योग
लाकडाला पर्याय म्हणून आज जगभरात प्लायवुडचा वापर केला जात आहे. आपल्या देशात शेकडो वर्षांपासून प्लायवुडचा वापर होत आहे. मागील शतकांमध्ये, प्लायवुडचा वापर वस्तू वेष्टनबंद करण्यासाठी केला जात असे. चहाची वाहतूक करताना चहा सुरक्षित रहावा, म्हणून प्लायवूडचा वापर चहा बंद करण्यासाठी प्रथम केला गेला. प्लायवूडचे खोके…
थंड पेयांचा व्यवसाय
भारतात सरबत, फळांचा रस, सोडा, गार पाणी यासारख्या पेयपदार्थ विक्रीच्या क्षेत्रात अलिकडच्या वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. ही पेये अल्कोहोल नसणारी आहेत. फळे, काजू, मुळे, औषधी वनस्पतींच्या इतर स्त्रोतांपासून नैसर्गिक ‘फ्लेवर’ तयार केले जातात. भारतातील लोकप्रिय पेयांमध्ये ‘बिस्लेरी’, ‘माझा’, ‘स्प्राइट’ आणि ‘फ्रुटी’ यांचा समावेश आहे….
टरबूज लागवड
‘टरबूज’ हे मूळ दक्षिण आफ्रिकेतील फळ आहे. टरबूजाच्या रसामध्ये प्रथिने, खनिजे आणि कार्बोहायड्रेट्ससह 92% पाणी असते. जपानमध्ये काचेच्या पेटीत टरबूज वाढवतात. टरबूजांची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये केली जाते. टरबूज खोल, सुपीक आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत चांगले वाढते….
सीएफएल दिव्यांची निर्मिती
प्रत्येक घरात विद्युत उपकरणे अत्यावश्यक आहेत. प्राचीन काळी रॉकेलचे दिवे प्रकाशासाठी वापरले जायचे. तंत्रज्ञान बदलामुळे आज प्रत्येक घरात विविध उपकरणांसाठी वीज वापरली जाते. विजेचा वापर केवळ घरातील दिवा लावण्यासाठी केला जात नाही, तर विजेवर चालणाऱ्या अनेक उपकरणांसाठी केला जातो. गेल्या काही वर्षांत सरकारने वीजनिर्मिती वाढविण्याकडे…
लोणचे व्यवसाय
लोणचे बनविण्याचा व्यवसाय हा घरगुती पातळीपासून ते मोठ्या उद्योगापर्यंत करता येणारा महत्त्वपूर्ण व्यवसाय आहे. लोणचे हा भारतीयांचा सर्वात आवडता पदार्थ आहे. लोणचे जेवणातील स्वादिष्टता वाढवते. बाजारातील प्रचंड मागणीवर आधारित असणारा हा व्यवसाय सोपा आणि अधिक फायदेशीर आहे. तुम्ही फक्त रु. 10000 च्या माफक गुंतवणुकीत लोणच्याचा…
खजूर शेती
खजुराची लागवड प्रामुख्याने अरब देश, इस्राइल आणि आफ्रिका या देशांमध्ये केली जाते. इराण हा खजूरांचा प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार आहे. गेल्या दशकांपासून भारत सरकार खजूर लागवडीसाठी खूप मेहनत घेत असून लागवडीखालील क्षेत्र वाढवत आहे. भारतात राजस्थान, गुजरात, तामिळनाडू आणि केरळ ही खजूर पिकवणारी प्रमुख राज्ये…
जहाजबांधणी उद्योग
बंदरांची वाढणारी संख्या आणि त्यातून अर्थव्यवस्थेची होणारी भरभराट, संरक्षण तसेच व्यापाराच्याही दृष्टीने जहाजबांधणी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करायला हवे. भारताला विस्तीर्ण असा समृद्ध सागरी किनारा लाभला आहे. इसवी सन पूर्व 3000 च्या आसपास सिंधू संस्कृती नौका आणि जहाजे वापरण्यासाठी ओळखली जात होती. त्यावेळी हा जहाजबांधणी उद्योग…
पाळणाघर सुरू करताना
‘पाळणाघर’ ही शहरी भागात राहणाऱ्यांची गरज बनली आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे पाळणाघराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढू लागले आहे. नोकरीमुळे मुलांच्या वेळेसोबत आई – वडिलांच्या कामाची वेळ जोडून घेता येत नाही. नोकरदार पालकांसाठी मुलांची सुरक्षितता हा महत्त्वाचा विषय आहे. गृहिणी आपल्या घरी हा व्यवसाय सहज सुरू करू शकतात….
द्राक्ष शेती
‘द्राक्ष शेती’ हे जगातील अतिशय लोकप्रिय पीक आहे. बहुतेक देशांमध्ये ते व्यावसायिकरित्या घेतले जाते. ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. यात ‘ब’ जीवनसत्व आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. द्राक्ष ही कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांचा चांगला स्रोत आहे. द्राक्ष कच्ची खाण्यासाठी वापरली जातात. जेली, जाम, मनुका,…
चप्पल उद्योग
‘चप्पल’ खरेदीची हौस अनेकांना असते. प्रत्येक कपड्याच्या प्रकाराप्रमाणे, सोहळ्याप्रमाणे आपण चप्पलांची निवड करतो. कोणत्या प्रकारच्या वेशभूषेवर कोणती चप्पल शोभून दिसणार याकडेही प्रत्येकाचे लक्ष असते. चला तर मग सर्वांच्या आवडत्या अशा ‘चप्पल उद्योगा’बद्दल आज सविस्तर जाणून घेऊया. कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल की सर्वांत…
ड्रायक्लीनिंग व्यवसाय
शहरांमध्ये ड्रायक्लीनिंगचा व्यवसाय जोरात सुरू असतो. हा व्यवसाय शहरी आणि निमशहरी भागात व्यवस्थित चालतो, परंतु ग्रामीण भागात जिथे शाळा, महाविद्यालये, कंपन्या, कारखाने आहेत, तिथे हा व्यवसाय जोरात चालतो. बरेच लोक आपले कपडे घरी धुतात. तरीही लोकांचा एक वर्ग आहे, जे कपडे धुण्यासाठी बाहेर देतात. शहरीकरणामुळे…
वांग्याची लागवड
‘वांगी’ पिकाची लागवड वर्षभर खरीप आणि रब्बी हंगामात व अगदी उन्हाळ्यातही करता येते. कोरडवाहू शेतीत, तर कधी मिश्रपीक म्हणूनही वांग्याची लागवड करतात. पांढरी वांगी मधुमेही व्यक्तींसाठी गुणकारी असतात. वांग्यामध्ये खनिजे, ‘अ’,‘ब’, ‘क’ ही जीवनसत्त्वे; तसेच लोह, प्रथिने यांचे पुरेसे प्रमाण पुरेसे असते. महाराष्ट्रात अंदाजे 28,…
कागद उद्योग
भारतातील कागद उद्योग हा एक कृषी-आधारित उद्योग आहे. जागतिक स्तरावर ‘भारतीय कागद उद्योग’ उच्च स्थानावर आहे. देशातील पहिली कागद गिरणी इसवी सन 1812 मध्ये सेरामपूर-बंगाल येथे स्थापन झाली; परंतु कागदाच्या मागणीअभावी ती अयशस्वी झाली. सन 1870 मध्ये कोलकाता जवळील ‘बालीगंज’ येथे हा उपक्रम पुन्हा सुरू…
खासगी बँकांमधील नोकरी
आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात बँकिंग क्षेत्राला खूप महत्त्व आले आहे. खासगी बँकांनी बँकिंग क्षेत्रात स्वत:चा लक्षणीय ठसा उमटवला आहे. या बँकांमध्ये विविध प्रकारच्या अनेक नोकऱ्या उपलब्ध असतात. खासगी बँकेत नोकरी मिळविण्यासाठी योग्य पात्रता असणे आवश्यक असते. वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतलेल्या मुलामुलींच्या मनात या नोकरीचे आकर्षण…
मेथीची लागवड
महाराष्ट्रात मेथी ही पालेभाज्यांमधील लोकप्रिय पालेभाजी आहे. मेथी पीक म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. दैनंदिन आहारात मेथीचा वापर आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे या पिकाला वर्षभर चांगली मागणी असते. मेथी पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते काळी आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते….