बर्फ बनविण्याचा उद्योग
उन्हाळा आला की थंडगार पाणी, सरबत, आइस्क्रिम, बर्फाचा गोळा यांची मागणी वाढते. या सर्वांना थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बर्फ आवश्यक असतो. एवढ्या मोठ्या प्रमाणातील बर्फाची मागणी बर्फ निर्मिती करणाऱ्या कारखान्यांतून पूर्ण केली जाते. चला तर मग, आज माहिती घेऊया बर्फ बनविण्याच्या उद्योगाबद्दल. बर्फाचा कारखाना सुरू…
सिमेंट उद्योग
आधुनिकीकरणामुळे सिमेंट क्राँक्रीटच्या इमारतींची जंगले बांधली जात आहेत. सिमेंट उद्योगातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मागणी जास्त असल्याने हा कायमच तेजीत असणारा उद्योग आहे. वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागातील मातीच्या साध्या टाइलच्या घरांची जागा सिमेंट काँक्रीटच्या घरांनी घेतली आहे. बहुमजली इमारती, अपार्टमेंट, बंगले, रो-हाऊस, उड्डाणपूल,…
चहा व्यवसाय
‘चहा फ्रँचायझी’ हा उद्योग व्यापक होऊ लागला आहे. अनेक ब्रँड्स आणि कंपन्यांनी उद्योगात स्वतःची ओळख करून दिली आहे. त्यामुळे या व्यवसायात चांगला फायदा मिळतो. उत्तर भारतापासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत प्रत्येक कुटुंबाला व प्रत्येक व्यक्तीला हे पेय आवडते. ते भारतातच नव्हे, तर जगभरात सर्वाधिक सेवन…
वालाची लागवड
वालाची लागवड ताटी पद्धतीने करावी लागते. वेल अंदाजे ५ मीटरपर्यंत वाढते. वेलीला आधार दिल्यास आणि वर्षभर वेलींची छाटणी करत राहिल्यास उत्पादन चांगले मिळते. वालाची लागवड केल्यापासून वेल ताटीवर चढेपर्यंत अंदाजे २ महिन्यांचा कालावधी जातो. त्यामुळे मधल्या काळात पालेभाज्यांचे मिश्रपीक घेण्याचा विचार शेतकरी करू शकतात. पश्चिम…
घरघूती डब्बा सेवा व्यवसाय
देशभरात नोकरीच्या संधी विकसित होत आहेत आणि लोक त्यांच्या स्वप्नातील नोकऱ्या मिळवण्यासाठी मुंबई, पुणे, हैद्राबाद आणि दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये जात आहेत. रोजगाराच्या वाढत्या संधी आणि नवीन शैक्षणिक संस्थांमुळे मोठ्या शहरांना लोकसंख्येच्या मोठ्या ओघाचा सामना करावा लागत आहे. जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर तुम्ही…
भेंडीची शेती
महाराष्ट्रात भेंडीची लागवड अनेक जिल्ह्यांत केली जाते. भेंडीला ग्राहकांची मागणीही मोठ्या प्रमाणात असल्याने याचे उत्पादन वर्षभर घेता येते. भेंडीमध्ये कॅल्शियम, आयोडिन आणि ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. भेंडीचे पीक खरीप आणि उन्हाळी हंगामात चांगले येते. भेंडीच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी शेतजमीन आवश्यक असते. किमान…
खिळे बनवण्याचा उद्योग
‘खिळा’ ही वस्तू माहिती नसणारी व्यक्ती जगाच्या पाठीवर तरी शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाच्या घरात, कार्यालयात किमान १ खिळा तरी नक्कीच असतो. खिळ्याला असलेली मागणी ही सतत वाढत जाणारी आहे. लघुउद्योगातून महिन्याला किमान २४ लाख खिळे तयार होतात. खिळे बनवण्याची प्रक्रिया ही यंत्रांवर आधारित आहे. त्यामुळे…
गादी बनविण्याचा व्यवसाय
अल्प उत्पन्न गट ते श्रीमंत यांच्याकडे आढळणारी एक सामायिक गोष्ट म्हणजे ‘गादी’! गादीचे प्रकार वेगवेगळे असतील, पण किमान एक गादी सद्यःस्थितीत तरी आपल्याला प्रत्येकाच्या घरात आढळते. काही वर्षांपूर्वीपर्यंत शहरात कापूस पिंजून देऊन आपल्या घरासमोरच बसून गादी शिवून देणारा व्यक्ती यायचा. आता वाढत्या शहरीकरणात एखाद्या गावात…
लिची लागवड
उष्णकटिबंध प्रदेशातील ‘लिची’ची लागवड भारतात अनेक ठिकाणी केली जाते. हे मूळ ‘चीन’मधून आलेले फळ आहे. चीनच्या खालोखाल लिची उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. जम्मू – काश्मीर, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामध्ये लिचीची लागवड प्रामुख्याने केली जाते. आता हळूहळू लिची उत्पादन घेण्यासाठी इतर राज्येही पुढे येत…
घासणी उद्योग
भांड्यांची स्वच्छता करण्यासाठी घासणी म्हणजेच स्क्रबरचा वापर सगळीकडे केला जातो. जेव्हा घासणीचा शोध लागला नव्हता, तेव्हा नारळाच्या शेंडीचा वापर घासणीसारखा केला जायचा. घासणीमुळे तेलकट – तूपकट झालेली भांडी लख्खं होतात. चकाकू लागतात. घासणी उद्योगामध्ये कमी गुंतवणूक आणि जास्त नफा दडलेला आहे. हा लघुउद्योग घरच्या घरी…
दंतचिकित्सा व्यवसाय
दंतचिकित्सा हा एक स्वतंत्र व्यवसाय असून आरोग्य सेवांचा एक महत्त्वाचा विभाग आहे. दंतचिकित्सा व्यवसायासाठी तोंडाची रचना, दातांची उत्पत्ती, विकास आणि कार्यप्रणाली आणि इतर अवयव, औषधे, शस्त्रक्रिया आणि यांत्रिक उपचारांचे योग्य ज्ञान आवश्यक आहे. विकसनशील देशांमध्ये दंत व्यवसाय करणे हे अधिकाधिक सामान्य होत चालले आहे. परिणामी…
सुरण लागवड
‘सुरण’ ही उष्णकटिबंधीय भागातील कंदमूळ गटातील वनस्पती आहे. आशिया आणि आफ्रिका खंडात उत्पादन घेतले जाते. विशेषतः भारतातील केरळ, तामिळनाडू, गुजरात या राज्यांत आणि श्रीलंकेत सुरणाची शेती केली जाते. महाराष्ट्रात तुलनेने सुरणाची शेती मर्यादित स्वरुपात आढळते. हे पिकाची वाढ उष्ण प्रदेशात, उबदार आणि ओलसर हवेत चांगली…
रबर शिक्का निर्मिती उद्योग
कोणत्याही कार्यालयीन कामकाजात शिक्क्याला महत्त्व असते. तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल की, “या पत्रावर स्टॅम्पची गरज आहे” आणि त्या पत्रावर काम मिळाला की ते कामही चटकन होऊन जाते. तर अशा या ‘रबर शिक्का’ उद्योगाबद्दल जाणून घेऊ. बाजारात दोन प्रकारच्या रबर शिक्क्यांना मागणी आहे. पहिला प्रकार…
आयुर्वेदिक औषधांचे दुकान
जगाला पुन्हा एकदा आयुर्वेदाचं महत्त्व समजू लागलं आहे. झटपट औषधांपेक्षा मूळातून आजार बऱ्या करणाऱ्या आयुर्वेदिक उपचारपद्धतीकडे लोकांची जास्त ओढ आहे. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आयुर्वेदिक दवाखाना, रुग्णालय यांच्या आसपासच्या परिसरात किंवा एखाद्या वैद्याच्या दवाखान्यामध्येही थोडी जागा घेऊन आपण औषधालय सुरू…
केवडा लागवड
भारतात फुलशेतीला महत्त्व प्राप्त होत आहे. बरेच शेतकरी फुलांची शेती करताना आपण महाराष्ट्रातही पाहायला लागलो आहोत. बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने फुलशेतीमध्ये यश मिळताना दिसत आहे. केवड्याचा वापर सुगंधी द्रव्ये, मिठाई, सौंदर्य उत्पादने यांमध्ये केला जातो. ‘केवडा’ हा जगातील सर्वांत सुगंधी फुलांच्या यादीमध्ये स्थान मिळवलेलं…
हातमोजे उद्योग
कोविडच्या वेळी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक शब्द जनसामान्यांच्या रोजच्या वापरात रूढ झाले. आपण वैद्यकीय क्षेत्रात रोज वापरात येणाऱ्या मास्क, हातमोजे, सॅनिटायझर, पीपीई कीट, केस झाकायला टोपी यांसारख्या गोष्टी रोज वापरू लागलो. या गोष्टींपैकी शस्त्रक्रियेच्या वेळी वापरले जाणारे हातमोजे म्हणजेच ‘ग्लोव्हज्’ उद्योगाबद्दल जाणून घेऊया. या उद्योगातून मिळणारा…
आंबा विक्री व्यवसाय
वर्षभरातून एकदाच खायला मिळणाऱ्या आंब्याला देशविदेशातून मागणी आहे. मार्चपासून आंब्याची चाहूल बाजारात लागू लागते. तो जूनपर्यंत मुक्कामी असतो. त्यामुळे कमी महिन्यात जास्त नफा करून देणारा असा हा ‘आंबा विक्री व्यवसाय’. आंब्याचा रस हल्ली प्रक्रिया उद्योगामुळे आपण वर्षभर चाखू शकतो. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानातील सुधारणेमुळे आंब्याचे विविध पदार्थ…
फणस शेती
फणस हे नगदी पीक आहे. त्यामुळे याची शेती ही नेहमी फायद्याची शेती मानली जाते. कोकण आणि दक्षिण भारतात या जोरावर अनेक प्रक्रिया उद्योग उभे आहेत. पक्क्या फणसाएवढाच कच्च्या फणसापासून तयार केलेले पदार्थही चविष्ट आणि रुचकर असतात. त्यामुळे कच्च्या आणि पक्क्या दोन्ही स्वरुपातील फणसांना बाजारात विशेष…
दुग्धपदार्थ उद्योग
जेवल्यावर थोडं तरी गोड खाण्याची इच्छा ही खूप जणांना होते. त्यात रोज वेगळा गोड पदार्थ हवा अशी मागणी असते. किमान मुंबईमध्ये आपण गल्लोगल्ली मिळाईची दुकाने बघतो. त्या दुकानांत रंगीबेरंगी, विविध चवीच्या मिठायांची रेलचेल असते. कोणती मिठाई घ्यावी, हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो; तर…
छापखाना व्यवसाय
‘प्रिंटिंग प्रेस’ म्हणजे सर्व प्रकारच्या कागदांवर मजकूर छापण्यासाठीचा छापखाना. हा व्यवसाय वर्षभर चालणारा असतो. वर्षभर अनेकजण लग्नपत्रिका, कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिका, दिनदर्शिका, पुस्तके, वह्या इत्यादी प्रकारच्या वस्तुंची छपाई करुन घेत असतात. या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल, यंत्रसामग्री, जागा आणि इमारतीची संपूर्ण किंमत यावर हा व्यवसाय किती…
फरसबी शेती
फरसबीची भाजी अनेकांना आवडते. फरसबी पुलावासह अनेक पदार्थांची लज्जत वाढवते. ही भाजी वेलवर्गीय आहे. ही रोपे नेहमीच्या रोपांप्रमाणेच वाढतात, म्हणून त्यांना कोणत्याही अन्य गोष्टींची आवश्यकता नसते. फरसबी अतिशय लवचिक असतात. ती सूर्यप्रकाशात आणि सावलीतही चांगली वाढतात. अर्धवट सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडा. फरसबी झुडूपवर्गीय नसल्याने…
चप्पल उद्योग
‘चप्पल’ खरेदीची हौस अनेकांना असते. प्रत्येक कपड्याच्या प्रकाराप्रमाणे, सोहळ्याप्रमाणे आपण चप्पलांची निवड करतो. कोणत्या प्रकारच्या वेशभूषेवर कोणती चप्पल शोभून दिसणार याकडेही प्रत्येकाचे लक्ष असते. चला तर मग सर्वांच्या आवडत्या अशा ‘चप्पल उद्योगा’बद्दल आज सविस्तर जाणून घेऊया. कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल की सर्वांत…
बॉलपेन निर्मिती
आज प्रत्येक घराची आणि प्रत्येक माणसाची पेन ही गरज आहे. व्यक्तीला दैनंदिन जीवनात कोणत्या ना कोणत्या कारणाने पेनची गरज असते. प्राचीन काळी लेखणीने लेखन केले जात असे. त्यानंतर दौत आणि टाक आले. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी शाईचे पेन वापरात होते. शाईचे भांडे, निप्पल, झिप असे साहित्य शाई…
कागदी लिंबू शेती
कागदी लिंबांना बाजारात सर्वाधिक मागणी आहे. कागदी लिंबे आकाराने लहान, 40 ते 45 ग्रॅम वजनाची असतात. या फळाची साल अगदी पातळ असते. त्याच्या रसाला मागणी जास्त आहे. झाडाला काटे जास्त असून झाडे वर वाढतात. काही लिंबे आकाराने मोठी असतात. वजन सुमारे 50 ते 70 ग्रॅम…
कापडी पिशव्यांची निर्मिती
प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यसाठी जगभरात ‘प्लास्टिक बंदी’ मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. प्लास्टिकचे निसर्गात विघटन होत नाही, त्याचा पुनर्वापरही जास्त दिवस करता येत नाही आणि प्लास्टिकचा पुनर्निर्मिती प्रकल्प उभारणेही खर्चिक असल्याने त्या वाटेला जाणाऱ्या उद्योजकांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे…