सिमेंट उद्योग

आधुनिकीकरणामुळे सिमेंट क्राँक्रीटच्या इमारतींची जंगले बांधली जात आहेत. सिमेंट उद्योगातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मागणी जास्त असल्याने हा कायमच तेजीत असणारा उद्योग आहे. वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागातील मातीच्या साध्या टाइलच्या घरांची जागा सिमेंट काँक्रीटच्या घरांनी घेतली आहे. बहुमजली इमारती, अपार्टमेंट, बंगले, रो-हाऊस, उड्डाणपूल, पक्के रस्ते, पूल अशा प्रत्येक बांधकामासाठी सिमेंटची मोठी मागणी दिवसेंदिवस वाढत जाणारी आहे.
‘चुनखडी’ हा सिमेंट उद्योगातील मुख्य कच्चा माल आहे. त्यामुळे ‘सिमेंट उद्योग’ हा चुनखडीच्या खाणी ज्या ठिकाणी असतील त्या आसपास सुरू करणे जास्त सोयीचे आहे. त्यामुळे उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्च यांचा समतोल साधता येईल. छोट्या सिमेंट प्रकल्पांमध्ये व्ही. एस. तंत्रज्ञान वापरले जात आहे.
सिमेंट उत्पादनासाठी चुनखडी, बॉक्साईट, मातीची भांडी, सी शेल, कोक, तेल, कोळसा, लॅटराइट, जिप्सम, पाणी इ. कच्चा माल लागतो. हॅमर मिल, जॉ क्रशर, बॉल मिल, बकेट लिफ्ट, भट्टी, टाकी, बॉल मोल्ड होईस्ट, मोटर, वीज, नोड्यूल गीझर इत्यादी यंत्रसामग्री उद्योग उभारणीसाठी आवश्यक आहे. सिमेंट उद्योग उभारणीसाठी किमान 4 ते 5 लाख रुपयांची पायाभूत रक्कम आवश्यक आहे.
लहान सिमेंट प्रकल्पांमध्येही उच्च दर्जाचे सिमेंट तयार केले जाते. सिमेंटची विक्री करण्यासाठी आपण मध्यस्थांची नेमणूक करू शकतो. किरकोळ विक्रेते, एजन्सी, बिल्डर्स, कंत्राटदार यांना भेटूनही आपण सिमेंटची विक्री करू शकतो.