
व्यक्तीची दिवसाची सुरुवात आंघोळ करून होते. काहीजण उन्हाळ्यात थंड पाण्याने व हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करतात; परंतु थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर असते. थंड पाण्याची आंघोळ मन आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आंघोळीसाठी पाणी किती थंड असावे, तर यासाठी बर्फासारख्या पाण्याची गरज नाही. पाणी इतके थंड असावे की शरीर ते सहन करू शकेल. तज्ज्ञांच्या मते, 21 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असलेले पाणी थंड मानले जाते. अशा थंड पाण्याने आपण आंघोळ करू शकता.
हा उपाय करून पाहिल्यास आपले वजन लवकर कमी होऊ शकते. थंड पाण्याने अंघोळ केल्याने रक्ताभिसरण गतिमान होते. स्नायूंची सूज आणि वेदनांमध्ये हे फायदेशीर मानले जाते. थंड पाणी वेदना कमी करून स्नायूंचे कार्य वाढवण्याचे काम करते. बहुतेक खेळाडू ही पद्धत वापरतात. आपल्या शरीराची क्षमता कोणत्याही प्रमाणात वाढवता येते. थंड पाण्याने आंघोळ केल्याने मेंदूवर ‘इलेक्ट्रोशॉक’ थेरपीसारखा प्रभाव पडतो. यामुळे व्यक्तीला आनंदी आणि चांगले वाटते. तसेच व्यक्तीची स्मरणशक्ती, मानसिक क्षमता वाढण्यास मदत होते.
शरीरातील चयापचय क्रिया जलद होते, जी शरीरासाठी आवश्यक आहे. एका संशोधनानुसार थंड पाण्याच्या संपर्कात आल्याने चयापचय दर अनेक पटींनी वाढू शकते.
हिवाळा जवळ आला की थंड पाण्याने आंघोळ केली की शरीराला थंडीची सवय होते. यामुळे थंडीमुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होते; पण हळूहळू त्याचा अवलंब करावा. थंड पाण्याने आंघोळीचे हे संभाव्य फायदे मिळविण्यासाठी बेफिकीर राहून उपयोग नाही; कारण याचाही विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमचे पाणी अतिथंड नसावे. आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आंघोळ करू नये. आजारी असाल तर थंड पाण्याची आंघोळ टाळावी. अधिक माहितीसाठी आणि याचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.