डाएटिंग करा पण विचारानेच

बदललेली जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे लोकांमध्ये वजनवाढीची समस्या दिसून येत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक डाएटिंग करू लागले आहेत. डाएटिंगचे शरीरावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. डाएटिंगमुळे शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचते.

व्यक्ती पुरेसे अन्न खात नाही, उपाशी राहते त्यावेळेस शरीराला ऊर्जा मिळत नाही. थकवा येतो. अशक्तपणा जाणवू लागतो. बहुतांश लोकांच्या स्वभावात चिडचिडेपणा येतो. रक्तातील साखरेची पातळीही कमी होते. स्नायूंमध्ये सैलपणा येऊन शरीराचा आकार बिघडू शकतो. पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. पचनाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. अनेकदा उलट परिणाम दिसू लागतो. व्यक्तीचे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते.

त्यामुळे डाएटिंग करताना वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच करावे. शरीरास पोषक असणारे कोणते पदार्थ आहारात घ्यावेत, हे विचारून त्याप्रमाणे आहार ठेवावा. योगासने करावीत. प्राणायाम करावा. सकाळ-संध्याकाळी मोकळ्या हवेत चालण्यास जावे. शरीराची हालचाल ठेवावी.






19,261 वेळा पाहिलं