केसांकडे दुर्लक्ष नकोच

जाड आणि मजबूत केस प्रत्येकाला हवे असतात. केस निरोगी ठेवण्यासाठी आपण काय-काय करत असतो. एकापेक्षा एक महाग उत्पादने वापरतो. काही वेळेस घरगुती उपायदेखील केले जातात; परंतु तरीही केसांशी संबंधित समस्या कमी होत नाहीत. काही वेळेस तर त्या बंद झाल्या तरी पुन्हा त्रास सुरू होतो.काही वेळेस कळत-नकळतपणे आपण आपल्या केसांसंदर्भात काही अशा चुका करतो, ज्यामुळे केसांशी संबंधित समस्या वाढतच जातात. अशाच काही चुका, ज्याकडे वेळीच लक्ष देऊन आपण आपले केस सर्व समस्यांपासून वाचवू शकाल. केसांसंदर्भात या चुका कधीही करू नका.

केस वारंवार कंगव्याने विंचरणे टाळावे; कारण केस जास्त विंचरल्याने केस कमकुवत तर होतीलच; शिवाय ते तेलकटही होतील. गुंता झालेले केस सोडविण्यासा रुंद दातांचा कंगवा वापरावा; आणि हळुवारपणे जटा सोडवाव्यात.केस धुण्यासाठी कमीत कमी शाम्पू वापरावा. जास्त केस धुण्याने केस खराब होतात; पण तुम्ही कसेही जास्त दिवसांनी केस धुवू नका. जास्त वेळ केस न धुतल्याने डोक्यातील सुक्ष्म छिद्रे ‘ब्लॉक’ होतात, ज्यामुळे केसांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच दर तिसऱ्या दिवशी केस धुणे चांगले असते.

जर तुम्ही केस वाळविण्यासाठी ‘हेअर ड्रायर’चा जास्त वापर करीत असाल तर असे करणे टाळावे. त्यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात.केस ओले असताना सर्वात कमकुवत असतात. ओले केस झाडल्यावर ते अधिक तुटू शकतात. केसांच्या समस्या टाळण्यासाठी कधीही ओले केस विंचरून ‘हेअर स्टाइल’ करू नका. ते प्रथम वाळू द्यावेत, त्यानंतरच ‘स्टाइलिंग’ साधने वापरा.

कंगवा आणि ‘स्टाइलिंग’ साधने नियमितपणे स्वच्छ केली पाहिजेत. त्यांच्यावर साचलेली घाण तुमचे केस खराब करू शकते. कंगवा आणि ब्रश आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करावेत. काही महिन्यांच्या वापरानंतर ते बदलणे चांगले आहे, कारण त्यामुळे डोक्यात संसर्ग होऊ शकतो.केस मोकळे सोडून कधीही झोपू नका. कारण त्यामुळे त्यांचा गुंता होण्याची अधिक शक्यता निर्माण होते. संतुलित आहार न घेतल्यानेही केसांशी संबंधित समस्या निर्माण होतात.






16,088 वेळा पाहिलं