
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना चष्मा लावावा लागत आहे. पूर्वी ही समस्या फक्त वयोवृद्धांमध्ये होती. आता लहान वयात चष्मा लावण्याची पाळी येते. कॉम्प्युटर स्क्रीनवर काम करणाऱ्या लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. जेव्हा तुमचे डोळे कमकुवत होतात तेव्हा तुमच्या डोळ्यातील बाहुल्यांना त्यांचा आकार बदलण्यास त्रास होतो. अशा स्थितीत चष्मा लावणे काहीसे उपयोगी ठरते. या समस्येवर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.
आवळा डोळ्यांसाठी वरदान आहे. आवळा भरपूर पोषक आणि ‘सी’ जीवनसत्वयुक्त असून आरोग्यास फायदेशीर आहे. आवळ्याचे अनेक प्रकारे सेवन केले जाऊ शकते. आपण कच्चा आवळा, आवळा मुरंबा, आवळा रस, आवळा कँडी यांचे सेवन करू शकता. याशिवाय आवळ्याच्या पाण्यानेही डोळे धुवू शकता.
अक्रोड तेल शरीरासाठीच नाही तर डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. या तेलाने डोळ्यांना मसाज करावे. यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होईल. पोषकतत्वांनी युक्त अक्रोड तेलामध्ये काही गुणधर्म आहेत, जे डोळे चांगले ठेवण्यास मदत करते.
प्राचीन काळापासून तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. या भांड्यातील पाणी प्यायल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. तांब्यामध्ये काही घटक असतात, जे दृष्टी सुधारण्यास मदत करतात. हे पाणी पिऊन चष्मा काढण्यास मदत होऊ शकते. यासाठी रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवावे. सकाळी उठल्यावर भांड्यातील सर्व पाणी प्यावे. पायाच्या तळव्याचे मसाज करावे.
प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी व्यायाम हा एक प्रभावी मार्ग मानला जातो. वेळोवेळी डोळे मिचकावत रहावे. 2-3 तास सतत काम केल्यानंतर काही वेळ डोळे बंद करावेत. पायाचे बोट डोळ्यांच्या मध्यभागी ठेवून त्यावर लक्ष केंद्रित करावे. असे केल्याने दृष्टीची शक्ती वाढते. याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्याला मोहरीच्या तेलाने मसाज करावे. यामुळे डोळ्यांवरील ताण दूर होईल. हिरव्या गवतावर चालण्याचासुद्धा डोळ्यांना फायदा होतो. हिरव्या गवतावर सकाळी अनवाणी चालावे. तुमची दृष्टी झपाट्याने सुधारेल. डोळ्यांव्यतिरिक्त मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे खूप फायदेशीर ठरू शकते.