
साहित्य: बडीशेप – अर्धा कप, साखर – चवीनुसार, लिंबू – २ लहान चमचे, काळे मीठ – चवीनुसार, आवश्यकता असल्यास मीठ – चवीनुसार, पुदिन्याची पाने – ३ किंवा ४, बर्फ, पाणी.
कृती:
बडीशेप स्वच्छ धुवा. यानंतर बडीशेप सुमारे २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर ही बडीशेप काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या. यासोबत साखर, काळे मीठ, पुदिन्याची पाने आणि पाणी घाला. आता हे मिक्सरवर बारीक करून घ्या. हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. यानंतर त्यात पाणी आणि लिंबाचा रस घाला. गरज असल्यास साधे मीठ चवीनुसार वापरा. आता एका ग्लासमध्ये सरबत घ्या, आवश्यकतेनुसार त्यात बर्फाचे तुकडे टाका. बडीशेप सरबत पिण्यासाठी तयार आहे.