कोमल त्वचेसाठी गुणकारी अंजीर

निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी फळांचे सेवन करणेही फार चांगले आहे. अंजीर हे असेच एक उत्तम फळ आहे. अंजीरामध्ये मुबलक प्रमाणात पोषकतत्त्वे आढळतात. यामुळे त्वचेला चमक येते. आहारात अंजीराचा नियमित समावेश केल्याने त्वचेची नैसर्गिक चमक कायम राहण्यास खूप मदत होते.

अंजीरामध्ये भरपूर प्रमाणात ‘सी’ जीवनसत्व असते. यामुळे त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत होते. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आहारात अंजीराचा समावेश करावा. यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियमची चांगली मात्रा आढळते. यामुळे हाडे मजबूत होतात. अकाली वृद्धत्वाची लक्षणे दिसू नयेत यासाठी अंजीर खावेत. या फळात भरपूर पोषकतत्वे असतात, जी वृद्धत्वाची चिन्हे विकसित होण्यापासून रोखतात. त्वचेच्या कोरडेपणाची समस्या हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूंमध्ये दिसून येते. हा कोरडेपणा घालविण्यासाठी अंजीर खा. अंजीराचे एक किंवा दोन तुकडे घ्यावेत. ते रात्रभर पाण्यात भिजवावेत. सकाळी रिकाम्या पोटी त्यांचे सेवन केल्यास ते फायदेशीर आहे. सकाळी अंजीर खाणे निरोगी त्वचेसाठी सर्वात फायदेशीर मानले जाते.






12,128 वेळा पाहिलं