
उन्हाळ्यात शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाल्ले तर आपण आजारी पडू शकतो. या हंगामात, अशी फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे शरीराला अतिरिक्त थंडावा मिळतो. उष्माघाताचा प्रभाव कमी होतो. उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते.
नारळ पाणी : उन्हाळ्यात पोषकतत्वांनी युक्त नारळ पाणी पिणे खूप फायदेशीर ठरेल. रोज नारळ पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने शरीर उत्साही राहते.
संत्रे : संत्र्याचे सेवन केल्याने अनेक प्रकारे फायदा होतो. संत्र्यामध्ये 88 टक्के पाणी, ‘सी’ जीवनसत्व, कॅल्शियम आणि फायबर असते. त्यामुळे उन्हाळ्यात जास्तीत जास्त याचे सेवन करावे.
लिंबू : उन्हाळ्यात लिंबाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. हे उष्णतेपासून वाचविण्याबरोबरच आतून ताजेतवाने ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यात बाहेरून घरी आल्यावर नेहमी लिंबूपाण्याचे सेवन करावे.
हिरव्या भाज्या : काही हिरव्या भाज्या खाल्ल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते. पालेभाज्यांमध्ये भरपूर पाणी असते. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका होते.
काकडी : याशिवाय उन्हाळ्यात फायबरयुक्त काकडीचे सेवन करणे देखील फायदेशीर ठरेल. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे. रोजच्या आहारात काकडीचा समावेश नक्की करावा.
दही आणि लस्सी : दही आणि लस्सी उष्णतेपासून संरक्षण करते. आपण थेट दही खाऊ शकता; किंवा काकडीसोबत कोशिंबीर बनवून खाऊ शकता.