यकृतासाठी उपयुक्त पदार्थ

यकृत हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अगदी कार्बोहायड्रेट्सच्या साठवणुकीपर्यंतची कामे यकृत करते. चांगले आरोग्य राखण्यासाठी यकृत निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. काही नेहमीच्या आहारातील पदार्थ यकृताचे आरोग्य चांगले ठेवण्यात मदत करतात.

लिंबाचा रस
लिंबाच्या रसात ‘सी’ जीवनसत्व असते. लिंबू अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे. हा रस यकृतातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो.
ग्रीन टी
‘ग्रीन टी’ हे यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर पेय आहे. त्यात ‘कॅटेचिन’ हे अँटिऑक्सिडंट आहे. यकृताचे संरक्षण करण्यास ते मदत करुन जळजळ कमी करते.
द्राक्षांचा रस
द्राक्षांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्व ‘सी’ भरपूर प्रमाणात असते. यकृताचे आरोग्य सुधारण्यास मदत करणारी संयुगेदेखील त्यात असतात.
गाजर रस
गाजरामध्ये ‘बीटा-कॅरोटीन’चे प्रमाण जास्त असते. हे यकृताचे आरोग्य चांगले राखते. गाजराचा रस यकृतावरील ताण कमी करू शकतो.
हळद
हळदीमध्ये ‘कर्क्युमिन’ हा घटक असतो. हा घटक त्याच्या दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखला जातो. यकृतासाठी आहारातील हळदीचा समावेश चांगला असतो.

तरीही, एखादा पदार्थ आरोग्यासाठी चांगला आहे म्हणून तो अतिसेवन करणे हे सुद्धा हानिकारकच असते. त्यामुळे या पदार्थांचे औषध म्हणून सेवन करण्यापूर्वी आपल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.







22,020