गोव्याची इडली

साहित्य : २ कप बासमती तांदूळ, ३ चमचे साखर, आवश्यकतेनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी, 3/4 कप उडीद डाळ, 1 चमचा कोरडे यीस्ट, 3/4 कप नारळाचे दूध.

कृती :
दोन वेगळ्या भांड्यांमध्ये तांदूळ आणि उडीद डाळ ४-५ तास भिजत ठेवावे. ग्राइंडर किंवा ब्लेंडरमध्ये थोडे पाणी घालून तांदूळ व डाळीचे बारीक पीठ बनवावे. हे पीठ पातळ असू नये. म्हणजे ते वाहणारे नसावे. एका मोठ्या भांड्यात तांदळाचे पीठ आणि डाळीचे पीठ नारळाच्या दुधासह घालावे. मीठ, २ चमचे साखर घालून छान एकजीव करुन पीठ बाजूला ठेवावे. एका छोट्या भांड्यात यीस्ट, १ चमचे साखर आणि १/४ कप कोमट पाणी मिसळून बाजूला ठेवा. यीस्टचे मिश्रण कमीत कमी 10 मिनिटे बाजूला ठेवून नंतर पिठात घालावे. पिठात यीस्ट मिसळल्यानंतर ते 2-3 तास आंबण्यासाठी बाजूला ठेवावे. नंतर इडल्या वाफवून घ्याव्यात. इडल्या वाफवल्यानंतर गरमागरम सर्व्ह करा. इडली स्पंजी बनविण्यासाठी इडली वाफवण्यापूर्वी किमान 6-8 मिनिटे पीठ चांगली फेटावे.






12,219 वेळा पाहिलं