आरोग्यवर्धक बीटरुट

मानवी आरोग्यासाठी बीटरूट खूप फायदेशीर आहे. हे कंदमुळ अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्व बी-6, जीवनसत्व ए, सी आणि के, फॉलिक ॲसिड, मँगनीज आणि कॉपर यांसारख्या पोषकतत्वांनी समृद्ध आहे. तसेच हळदीमध्ये ‘कर्क्यूमिन’ नावाचे पोषणतत्व आणि अँटी-ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. त्यामुळे शरीराच्या सर्व सांध्यातील वेदना कमी होण्यास मदत होते. गुडघेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते. अशा परिस्थितीत, बीटरूट आणि हळद दोन्ही एकत्रितपणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. ते आपल्या शरीरातून जास्तीत जास्त विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे बीटरुटचा हळदयुक्त रस आरोग्यासाठी खूप चांगला ठरतो.

बीटरूट शरीराला आतून मजबूत ठेवण्यास मदत करते. इतकेच नाही तर रक्त शुद्ध करण्यात आणि चेहरा चमकदार ठेवण्यासही खूप मदत करते. बीटरूट नायट्रेटनेदेखील समृद्ध आहे. बीटरुट शरीरातील रक्तदाब नियंत्रित करुन हृदय निरोगी राखण्यास मदत करते. बीटरूटमधील नायट्रेट अधिक प्रमाणात ऑक्सिजन प्रदान करण्यास मदत करते. त्याच वेळी, हळद आपल्या यकृताला ‘डिटॉक्स’ करण्याचे काम करते. अशा स्थितीत बीटरुटचा रस हळदीसोबत प्यायल्याने आरोग्याला दुहेरी फायदे मिळतात.

बीटरूट व हळदीचा रस शरीरातील सर्व विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. हा रस शरीरातील ऊर्जा वाढविण्याचे काम करतो. बीटरूटचा रस रक्तवाहिन्यांना आराम देतो. रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. बीटरूट आणि हळद त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या दूर करण्यास मदत करते. बीटरूट आणि हळदीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक देतात. पचनक्रिया मजबूत ठेवण्यास मदत होते. पोटात जळजळ होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. हे एक नैसर्गिक आरोग्य पेय आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते. वापर करण्यापूर्वी आपल्या शरीरास अनुसरुन वैद्यकीय सल्ला घेणे केव्हाही चांगले !