
आरोग्य उत्तम राखणारी प्राणायाम ही एक प्रक्रिया आहे. यामध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करावे लागते. श्वासोच्छवासावर वेगवेगळ्या प्रकारे आणि ठराविक कालावधीसाठी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. प्राणायाम केल्याने अनेक फायदे मिळतात. या फायद्यांमुळे पाश्चिमात्य संस्कृतीही हळूहळू त्याचा अवलंब करीत आहे. रोज प्राणायाम करणे फायदेशीर ठरू शकते. आजच्या धावपळीच्या जीवनात शांतपणे झोपणे महत्वायचचे आहे. झोपेच्या अभावामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. याचे परिणाम भविष्यात भोगावे लागू शकतात. प्राणायामामुळे ही समस्या दूर होण्यास मदत होते. प्राणायाम केल्याने शरीराला आराम मिळतो. चांगली झोप लागते. त्यामुळे रोज १० मिनिटे प्राणायाम करणे खूप फायदेशीर ठरते.
प्राणायाम केल्याने फुफ्फुस मजबूत होण्यास खूप मदत होते. प्राणायाम करताना दीर्घ श्वास घ्यावा लागतो, ज्यामुळे फुफ्फुसातील प्रत्येक भागामध्ये ऑक्सिजन पोहोचतो. फुफ्फुसाचे स्नायू देखील मजबूत होतात. त्यामुळे प्राणायाम करणे निरोगी फुफ्फुसांसाठी खूप फायदेशीर आहे. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका असतो. उच्च रक्तदाबामुळे इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. या कारणास्तव, रक्तदाब नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. प्राणायाम केल्याने शरीराला आराम मिळतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते.
जीवनशैलीच्या अनेक सवयींमुळे अनेकांना तणाव वाढण्याची समस्या भेडसावते.
त्यामुळे हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. तणाव कमी करण्यासाठी प्राणायाम खूप उपयुक्त आहे. त्याच्या मदतीने, मज्जासंस्था लक्षणीयरीत्या आरामशीर होते, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. प्राणायाम करताना सर्व लक्ष श्वासोच्छवासावर केंद्रित करावे लागते. त्यामुळे, या काळात श्वासोच्छवासाबद्दल अधिक जागरूकता निर्माण होते. मानसिक जाणिवा वाढण्यास मदत होते. मानसिक आरोग्य उत्तम राहते. हा ध्यान करण्याचा एक मार्ग असून मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.