आरोग्यवर्धक फळे

फळे केवळ चविष्ट आहेत म्हणून ती खाण्यापेक्षा ती आरोग्यवर्धक आहेत म्हणून खावीत. यासाठी फळांमध्ये कोणते गुणधर्म आहेत, हे जाणून घ्यायला हवे, नाही का ? फायबरचे प्रमाण जास्त असलेले सफरचंद बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास ते मदत करू शकते. लोह्समृद्ध असणारे सफरचंद शरीरासाठी खूप उपयुक्त आहे.

केळे आपल्या यकृत आणि मूत्रपिंडांना शरीरातील कचरा उत्पादने काढून टाकण्यास मदत करते. केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, म्हणूनच ते मुतखड्याचा त्रास असणाऱ्यांसाठी उत्तम फळ आहे. ते जीवनसत्व ‘बी 6’ ने समृद्ध आहे. लाल चेरी सांधेदुखीसाठी फार उपयोगी आहे. हा त्रास असल्यास आहारात लाल चेरीचा समावेश करावा. या फळामध्ये ‘अँथोसायनीन्स’ नावाची संयुगे असतात, जी सूज कमी करण्यात मदत करतात.

कलिंगड हे भरपूर पाणी असणारे मोठ्ठे फळ आहे. त्याचा रंग आणि स्वाद पाहूनच ते खावेसे वाटते. कलिंगड पाण्याची कमतरता पूर्ण करते आणि पोट थंड ठेवते. जिममध्ये जाणाऱ्यांसाठी हे व्यायामापूर्वीचे उत्तम अन्न आहे. सर्वच फळांमध्ये आरोग्यवर्धक मात्रा असतात. म्हणून त्यांचे संतुलित प्रमाणात सेवन करायला हवे.






12,332 वेळा पाहिलं