आरोग्यवर्धक लिंबू पाणी

लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. लिंबू पाणी मुळातच चवदार असते. या पाण्यात अनेक पोषकतत्त्वे असतात. हे पाणी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. लिंबू पचनासाठीही खूप प्रभावी मानले जाते. लिंबामध्ये जीवनसत्व-सी भरपूर प्रमाणात आढळते. वजन कमी करण्यासाठीही लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अनेकजण सकाळची सुरुवात या पेयाने करतात.

लिंबाच्या रसामध्ये असलेले जीवनसत्व आणि खनिजे पचनक्रिया व्यवस्थित ठेवतात. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून ते रिकाम्या पोटी पिण्याचा सल्ला दिला जातो. हे शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकते. यामुळे जळजळ कमी होते, वजन कमी करण्यासोबत अपचनाच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

लिंबामध्ये जीवनसत्व-सी जास्त असते. लिंबाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, फोलेट, जीवनसत्व-बी सारखे पोषक घटक आढळतात. हे घटक तणावामुळे होणारा तीव्र दाह टाळण्यास मदत करतात. यामध्ये असलेले जीवनसत्व-सी अन्नातून लोह शोषण्यास मदत करते. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारते.

लिंबू पाण्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्याही कमी होऊ शकतात. लिंबू पेयामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. रक्तदाब कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरू शकतात. लिंबू पाण्यात कॅल्शियम आणि पोटॅशियम हे दोन्ही घटक मुबलक प्रमाणात आढळतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहेत.
लिंबू पाण्याचे हे लाभ लक्षात घेऊन वैद्यकीय सल्ल्यानुसार त्याचे नियमित सेवन करण्यास हरकत नाही.






10,271 वेळा पाहिलं