घरगुती फेस टोनर

उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळणे गरजेचे असते. उष्णतेमुळे त्वचा चमकदार ठेवणे आवश्यक असते. ‘स्किन केअर रूटीन’मध्ये ‘फेस टोनर’ आवश्यक असतो. तो चेहरा स्वच्छ करण्यास मदत करतो. तसेच त्वचेची छिद्र पूर्णपणे स्वच्छ करतो.

काकडीचे पाणी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. काकडी त्वचेची चमक परत आणण्यासाठी आणि किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी फायदेशीर आहे. काकडीचे बारीक तुकडे करावेत. नंतर ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. त्यात १ कप पाणी आणि एक चमचा कोरफड जेल घालावी. तयार झालेले मिश्रण एका बाटलीमध्ये भरून चेहऱ्यावर लेप म्हणून वापरावे.

त्वचेसाठी तांदळाचे पाणीही उत्तम आहे. त्यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. ते बनवण्यासाठी एका भांड्यात १ कप तांदूळ पाण्यात ठेवा. ते चांगले मिसळून घ्या. पाणी फेसाळ होईपर्यंत ते ढवळत रहा. नंतर हे पाणी गाळून बाटलीत ठेवावे आणि गरजेप्रमाणे चेहऱ्यावर लेप म्हणून लावावे.






18,089 वेळा पाहिलं