
आयुष्यात अनेक मित्र-मैत्रिणी असतात. त्यातील एक किंवा दोनच खास असतात. आपली खास मैत्री जपून ठेवणे आयुष्यात फार गरजेचे असते. मैत्रीला मोठे महत्त्व आहे. ती जपून ठेवली पाहिजे. एकमेकांच्या सहकार्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी मैत्री हवीच ! मैत्री जपून ठेवण्यासाठी मित्र किंवा मैत्रिणीस कधीतरी घरी बोलवा. किंवा बाहेर कुठेतरी भेटण्यास सांगा. स्वत:च्या हातांनी छानसा पदार्थ बनवा. टेबल सुंदरपणे सजवा. मग हसतखेळत, मस्करी करत जेवणाचा आनंद घ्या. कधीतरी जिवलग मित्र किंवा मैत्रिणीसोबत दिवसभर बोहर जाण्याची योजना आखा. यामुळे तुमचे मैत्रीचे बंध आणखी मजबूत होतील.
संगीत हा भावना आणि आठवणी जागृत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मैत्रीशी संबंधित गाण्यांची यादी बनवा. मित्र-मैत्रिणीसोबत बसून बोलण्यासोबतच संगीताचाही आनंद घ्या. मित्रासोबत छायाचित्रे घ्या. तुमच्या मैत्रीच्या प्रवासाचे चित्रण करा. तुमचा जिवलग मित्र एका शहरात नसून दुसऱ्या शहरात असेल तर संपर्कात रहा. मित्र किंवा मैत्रिणीला तुमच्या आयुष्यात किती अर्थ आहे ते कधीतरी सांगा. त्याच्या उपस्थितीत कधीही एकटेपणा जाणवू देवू नका. मित्रत्व हे आयुष्यभर मनुष्याच्या सोबतीला असते, हे लक्षात असू द्या.