
अनेकजणांचे ओठांच्या कोरडेपणामुळे ओठ फाटतात. कधी-कधी अशा ओठातून रक्तही येऊ लागते. हिवाळ्याच्या दिवसात तर लोक या समस्येने फारच त्रस्त असतात. कडक उन्हाळ्यातही ओठ कोरडे होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी फाटलेल्या ओठांवर लिप बाम लावला जातो, आणि ते योग्य आहे. पण लिप बाम फक्त बाहेर जातानाच लावणे योग्य नाही. तो आपल्या ओठांच्या स्थितीनुसार कधी आणि कितीवेळा लावायचा हे निश्चित करून लावायला हवा.
फाटलेल्या ओठांवर तुम्ही लिप बाम लावू शकता. हा लावताना लक्षात ठेवा की ज्यांचा तुम्हाला त्रास होणार नाही, असे लिप बाम वापरायला हवेत. तुम्ही लिप मॉइश्चरायझर देखील वापरू शकता. फाटलेल्या ओठांना सुस्थितीत आणण्यासाठी दिवसातून अनेक वेळा आणि झोपण्यापूर्वी लीप बाम लावा. जर ओठ खूप कोरडे पडले असतील, आणि फाटलेले असतील तर लीप बामचा जाड थर लावा. सकाळी आंघोळीनंतर लगेच लिप बाम लावा, जेणेकरून ओठांवर ओलावा येईल. लीप बाम ओठांचे संरक्षण करतो.
दिवसभर ओठ हायड्रेशनसाठी तयार करतो.रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा लावा.दिवसातून 4 ते 5 वेळा फाटलेल्या ओठांवर लिप बाम लावू शकता. खूप उष्ण, थंड किंवा वारा असेल तर तिथेही ओठ चांगले ठेवण्यासाठी अनेक वेळा लिप बाम लावावा लागेल.