
अलीकडे हृदयविकाराचे प्रमाण खूप वाढलेले आहे. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहारात कडधान्य असणे खूप महत्त्वाचे आहे. रोजच्या आहारात गव्हापासून बनविलेली लापशी ते नाचणी, बाजरी यासारख्या गोष्टींचा समावेश करा. ब्रेड आणि पास्ता खाणे पूर्णपणे टाळा. धान्यांमध्ये फायबर तसेच खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. ते कोलेस्ट्रॉल, रक्दाब नियंत्रित करतात. खाण्यामध्ये जवस असू द्या. जवस खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. दररोज सुमारे 4 चमचे जवसाच्या बिया खाल्ल्याने उच्च रक्तदाब कमी होतो.
बदाम, शेंगदाणे, अक्रोड हे पदार्थ आहारात असावेत. यांच्यात ‘अनसॅच्युरेटेड फॅट’ असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. यातील फायबर कोलेस्ट्रॉलला रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते.
सोया दूध, सोया बडी यामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याची क्षमता असते. अभ्यासानुसार दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या तुलनेत सोया दुधात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी असते. त्यामुळे सोया दूधाला फुल फॅट दुधाऐवजी घेतले जाऊ शकते. अर्थात, हे प्रयोग वैद्यकीय सल्ल्यानुसार करावेत.