
घरी बनवलेले फेसपॅक किंवा हेअर मास्कचा नियमित वापर उत्कृष्ट परिणाम देतो. आपले केस रेशमी आणि मजबूत बनवण्यासाठी घरच्या घरी कंडिशनर कसे बनविणे शक्य आहे. हे कंडीशनर दही आणि मेथीच्या दाण्यांपासून बनवले जाते. ते केसांवर खूप चांगले परिणाम दर्शवते. आवळा हा जीवनसत्व ‘सी’चा एक शक्तिशाली स्रोत आहे. हा ‘कोलेजन’ निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. केसांची ताकद आणि लवचिकता राखण्यासाठी ‘कोलेजन’ आवश्यक आहे. यामुळे केस मजबूत होतील. तुटण्याची शक्यता कमी होईल.
हे रक्ताभिसरण वाढवू शकते, ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण आणि ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होतो. जर तुमच्या केसांमध्ये खूप कोंडा असेल तर आपण कंडिशनर लावू शकता. नियमितपणे लावल्याने टाळू निरोगी होईल. आवळा केसांना नैसर्गिक चमक देण्यासाठी ओळखला जातो. आवळ्याचे कंडिशनिंग गुणधर्म केसांना मऊ बनवतात. आवळा कंडिशनरचा प्रभावीपणे फायदा होण्यासाठी ते स्वच्छ आणि ओल्या केसांवर लावा. नंतर काही वेळ राहू द्यावे आणि नंतर चांगले धुवावे.
या कंडिशनरसाठी लागणारे साहित्य : 2 चमचे मेथी दाणे, अंबाडीचे दाणे २ चमचे तांदूळ, १ आवळा, ठेचून आले, पाणी, अर्धा लहान चमचा एरंडेल तेल, 1 मोठा चमचा बदाम तेल, आवळ्याचा रस किंवा आवळा पावडर
हा कंडीशनर बनविण्यासाठी एका काचेच्या भांड्यात मेथी दाणे आणि तांदूळ घाला. त्यात पाणी घालून रात्रभर भिजवू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजवलेले साहित्य गाळून घ्या. त्यात ठेचलेला आवळा आणि आले घाला. पाणी घालावे. एका कढईत थोडा कढीपत्ता घालून मिश्रण एक मिनिट उकळवा. आता हे मिश्रण गाळून घ्या. आवळा पावडर किंवा आवळ्याच्या रसात गाळलेले मिश्रण मिसळा. नंतर त्यात अर्धा मोठा चमचा एरंडेल तेल आणि १ मोठा चमचा बदाम तेल घाला. केसांना नीट मसाज करताना ते लावा. तासभर तसेच राहू द्या आणि नंतर केस स्वच्छ धुवा.
हा प्रयोग करण्यापूर्वी आपल्या ब्युटिशिअनचा सल्ला घ्या.