मसाला दूध

कोजागरी पौर्णिमा, यादिवशी विशेषकरुन आपण घरी मसाला दूध बनवितो. पौर्णिमेच्या पिठूर चांदण्यात ते प्राशन करण्याचा आनंदच वेगळा, नाही का?
मसाला दूध बनविण्यासाठी साहित्य : 1 लिटर दूध, 100 ग्रॅम साखर, अर्धा लहान चमचा वेलची पावडर, काजू-बदाम-पिस्त्याचे काप, चारोळी, १ चिमूटभर जायफळ पावडर, 5-6 केशर काड्या.

कृती :
सर्वप्रथम एका स्वच्छ भांड्यात दूध घ्या. गॅसच्या मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवा. दुध आटुन अर्धे होईल इथवर आटण्यासाठी गॅसवर ठेवा. मध्ये-मध्ये नीट ढवळत राहा, जेणेकरून ते जळणार नाही. भांड्याला चिकटणार नाही. दूध आटुन कमी झाल्यावर त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि साखर घालून मिसळून घ्या. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले काजू, बदाम, पिस्ता, काही चारोळ्या आणि केशरच्या काड्या घालून आणखी पाच मिनिटे उकळा. दूध तयार झाल्यानंतर एका ग्लासमध्ये काढा. काही वेळ चंद्राच्या प्रकाशात ठेवा. त्यानंतर मसाला दुधाचा आस्वाद घ्या.







24,978