मोबोर किनारा

गोव्याचे उत्तर व दक्षिण असे दोन जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक रमणीय सागरकिनारे आहेत. यापैकी   दक्षिणेकडील किनारपट्टीवर ‘साळ’ नदीच्या काठावर ‘मोबोर’ हा 30 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. हा एक नयनरम्य आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. हा किनारा सदैव पर्यटकांनी गजबजलेला असतो.  हा किनारा म्हणजे दक्षिण गोव्यातील सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे. साळ नदी या समुद्रकिनाऱ्यास वेढून जात नंतर अरबी समुद्राला मिळते. हे एक राष्ट्रीय उद्यान देखील आहे.  येथे निसर्गाचे मनोहर दृश्य पहायला मिळते.

या किनाऱ्यावरील वाळू मऊ आणि हलकी आहे.  येथे चालत असताना वाळूचे ढिगारे आणि उंच माड दिसतील.  येथील बीच कॅफेमध्ये स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद पर्यटक घेऊ शकतात. येथील मोहक दृश्यात ते स्वतःला हरवून बसतात. ॲडव्हेंचर्स डॉल्फिन पाहण्यासाठी क्रूझवर चढू शकतात.  गोव्यातील मासेमारी आणि शिंपले पकडणे यासारख्या जलक्रिडांचा आनंद घेऊ शकतात. येथे जाण्यासाठी विमान प्रवास केल्यास वास्को विमानतळावर उतरावे लागेल.