मायलेकीचे नाते

आई आणि मुलीचे नाते जितके सुंदर असते, तितकेच ते गुंतागुंतीचे असते. मुली त्यांच्या आईच्या सर्वात जवळच्या असतात, मात्र तेवढाच स्वतःच्या आईशी सर्वात जास्त संघर्षही असतो. जेव्हा मुलगी किशोरवयीन होते तेव्हा हे नाते अधिक गुंतागुंतीचे होते. हा गुंता सोडवून हे नाते छान खेळकर करण्यासाठी आपल्या किशोरवयीन मुलीची मैत्रीण बनून तिच्या भावना समजून घ्या. आपल्या मुलीची तुलना तिच्या मैत्रिणी, शेजारी किंवा भावंडांशी करू नका. प्रत्येकाची पौगंडावस्था वेगळी असते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलीची दुसऱ्याशी तुलना करून तिच्यावर दबाव निर्माण करू शकता. यामुळे ती चिडचिड करु शकतात. त्याच वेळी, त्यांना असेही वाटू शकते की तुम्ही त्यांच्या गुणांचा आदर करत नाही. यामुळे ते तुमच्यापासून दूर राहू शकतात.

त्यांचे ऐकून घ्या. कधीकधी असे होते की, तुमची मुलगी तुमच्याशी काहीही ‘शेअर’ करीत नाही. त्यांना असे वाटते की तुम्ही त्यांचे ऐकू नये. म्हणूनच, केवळ सल्ला देण्यासाठी नव्हे तर त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी त्यांचे ऐकण्याचा प्रयत्न करावा. बऱ्याच वेळा तुमच्या मुलीला फक्त तिच्या भावना तुमच्यासमोर मांडता याव्यात असे वाटते. यामुळे तुमच्या दोघांच्या संवादातील अंतरही कमी होईल. मोकळेपणाने बोला. पौगंडावस्थेत तुमच्या मुलीच्या शरीरात अनेक बदल होतात. ज्यामुळे तिचे मन गोंधळून जाते. बऱ्याच वेळा त्यांना कसे सामोरे जावे हे माहीत नसते. म्हणूनच तुम्ही त्यांचे मित्र बनणे महत्त्वाचे आहे. पौगंडावस्थेत होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांबद्दल त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला. यासोबतच त्यांच्याशी मासिक पाळी, शारीरिक संबंध इत्यादी सर्व गोष्टींबद्दल देखील बोला; जेणेकरून त्यांच्या मनातील संभ्रम दूर होईल. त्यांचा तुमच्यावर विश्वास बसेल की त्यांच्या समस्यांमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत आहात.

जर तुमच्या मुलीने तुम्हाला काही सांगितले असेल तर ते इतर कोणाशीही शेअर करू नका. विशेषत: तिचे मित्र आणि शेजारी यांना काही सांगू नका. तसे केल्यास ती तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. पुढे कधीही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला तरी यामुळे ती आपले विचार तुमच्याशी शेअर करू शकत नाही. तुमच्या मुलीचे छंद तुमच्यापेक्षा बरेच वेगळे असू शकतात, म्हणून तिच्या आवडींमध्ये रस घेण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी देखील देऊ शकते. अशा परिस्थितीत तिच्या आवडी-निवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. या गोष्टी आपल्या नात्यातील बंध मजबूत करण्यात मदत करू शकते.